उईघुर मुस्लिमांचा प्रश्न पेटणार, चीनवर निर्बंध लागणार?

usa nsa raised uighur issue उईघुर मुस्लिमांवरील अन्यायाप्रकरणी अमेरिका चीनवर कठोर निर्बंध लादण्याची शक्यता आहे.

usa nsa raised uighur issue
उईघुर मुस्लिम 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांनी उपस्थित केला उईघुर मुस्लिमांचा प्रश्न
  • उईघुर मुस्लिमांचा प्रश्न पेटण्याची शक्यता
  • अमेरिका चीनवर कठोर निर्बंध लादण्याची शक्यता

नवी दिल्ली: कोरोनासाठी जग चीनला (china) कारणीभूत धरत असतानाच विस्तारवादी धोरण राबवण्याचा प्रयत्न करुन चीन जगातील शांतता अडचणीत आहे. चीनच्या आक्रमकतेला लगाम घालण्यासाठी अमेरिका (usa) चीनविरोधात कठोर कारवाईच्या तयारीत आहे. लवकरच अमेरिकेकडून चीनवर कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन (Robert O’Brien, National Security Advisor, United States) यांनी या संदर्भात सुतोवाच केले. (usa nsa raised uighur issue)

चीन शिनजियांग (Xinjiang) प्रांतातील उईघुर मुस्लिम (uighur muslim / Uighur or Uyghur or Uygur or Uigur) या अल्पसंख्यांक समाजाचा अमानवी छळ करत आहे. चीन उईघुर मुस्लिमांचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार करत आहे किंवा करण्याच्या तयारीत आहे. चीनमधील अनेक मोठ्या डिटेंशन कँपमध्ये उईघुर मुस्लिम महिलांच्या डोक्यावरील सर्व केस जबरदस्तीने काढून टाकण्याचा उद्योग सुरू आहे, असा गंभीर आरोप रॉबर्ट ओब्रायन यांनी केला. ते एस्पेन इंस्टिट्युटच्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते. 

पहिल्यांदाच अमेरिकेतील एका उच्च पदावरील व्यक्तीने चीनवर थेटपणे नरसंहाराचा गंभीर आरोप केला आहे. याच कारणामुळे अमेरिका चीनवर कठोर निर्बंध लादण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नरसंहार हा मानवतेविरुद्धचा सर्वात गंभीर गुन्हा आहे. अमेरिकेने नरसंहाराचा ठपका ठेवून निर्बंध लादले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणे चीनला कठीण होईल. या निर्बंधांमुळे अमेरिका आणि चीन यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता चीन सरकारच्या प्रतिक्रियेकडे अनेकांचे लक्ष आहे. 

याआधीही चीनवर उईघुर मुस्लिमांचा छळ केल्याचे आरोप झाले आहेत. मात्र चीनने सातत्याने हे आरोप फेटाळले आहेत. पण नरसंहाराचा आरोप झाला आणि पाठोपाठ निर्बंध लागू झाले तर चीनची कोंडी होण्याची शक्यता आहे. उईघुर मुस्लिमांपैकी काही गट हिंसक आहेत आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करत आहे, अशी भूमिका चीन सरकार वारंवार घेत आहे. मात्र डिटेंशन कँपचा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. 

अमेरिकेच्या बॉर्डर कस्टम विभागाने उईघुर मुस्लिम महिलांच्या डोक्यावरील केसांपासून तयार केलेली अनेक उत्पादने जप्त केली आहेत. या प्रकरणाचा संदर्भ देत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीनवर गंभीर आरोप केला. उईघुर मुस्लिम महिलांच्या डोक्यावरील केसांपासून तयार केलेली उत्पादने तसेच उईघुर मुस्लिम महिलांचा छळ करुन जबरदस्तीने त्यांच्याकडून तयार करुन घेतलेली उत्पादने असल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने चीनमधून आलेला कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला. बॉर्डर कस्टम विभागाने जून महिन्यात ही कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या चौकशीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीनवर थेटपणे गंभीर आरोप केला. 

चीन जबरदस्तीने उईघुर मुस्लिम महिलांची नसबंदी करत असल्याचा आरोप अनेक मानवाधिकार संघटनांनी केला आहे. पाठोपाठ चीनवर नरसंहाराचा आरोप अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केला आहे. जिनपिंग सरकारच्या अधिकृत अहवालानुसार २०१४ ते २०१९ या कालावधीत चीनने शिनजियांग प्रांतातील चार लाख १५ हजार उईघुर मुस्लिमांना अटक केली आहे. यापैकी अनेकांना एकपेक्षा जास्त वेळा अटक झाली आहे. चीनच्या डिटेंशन कँपमधून आठ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे एरवी मुस्लिमांच्या मुद्यावर लगेच प्रतिक्रिया देणाऱ्या पाकिस्तानसह कोणत्याही मुस्लि देशाने चीनमधील उईघुर मुस्लिमांवर सुरू असलेल्या अन्यायाविरोधात चकार शब्द काढलेला नाही. पण अमेरिकेने उईघुर प्रकरणात चीनविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

उईघुर मुस्लिमांवर अन्याय केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने तीन चिनी नेत्यांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी लागू केली आहे. लवकरच अमेरिका आणखी कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. उईघुर मुस्लिम हे चीनमध्ये शिनजियांगा प्रांतात मोठ्या संख्येने आहेत. शिनजियांग प्रांत हा चीनचा एक षष्ठांश परिसर आहे. या भागातले उईघुर मुस्लिम हे चीनमधील अल्पसंख्यांक आहेत. 

मध्य आशियातील तुर्कस्तानमधून वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार स्थलांतरित झालेले हे उईघुर मुस्लिम चीनमध्ये शिनजियांग प्रांतात अनेक वर्षांपूर्वी येऊन दाखल झाले. ते स्वतःला चिनी तुर्कस्तानी म्हणवून घेत होते. एकेकाळी शिनजियांग प्रांतात ते बहुसंख्यांक होते. 

चीनमधील राजेशाही कारभाराच्या काळात चिनी राजाला लढायांमध्ये पायदळातील सैनिकांच्या रुपात उईघुर मुस्लिमांनी मदत दिली होती. याच कारणामुळे जगात सर्वाधिक उईघुर मुस्लिम शिनजियांगमध्ये वास्तव्यास आहेत. चीन व्यतिरिक्त जगातील आणखी काही देशांमध्येही मर्यादीत संख्येने उईघुर मुस्लिमांचे वास्तव्य आहे. मात्र जगात सर्वाधिक उईघुर चीनमध्ये आहेत. चीनमध्ये कम्युनिस्टांची (communist) सत्ता आली आणि हान (Han) समाजाचे महत्त्व वाढू लागले. उईघुर समाजाचे महत्त्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. असंख्य उईघुर मुस्लिमांना डिटेंशन कँपमध्ये टाकण्यात आले. आजही चीनचे कम्युनिस्ट सरकार उईघुर मुस्लिमांविरोधात कारवाई करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी