Video: अमेरिकेच्या नौदलाने फोडला 18 हजार किलोंचा महाकाय बॉम्ब, समुद्रात झाला भीषण भूकंप

अमेरिकेच्या नौदलाने आपल्या युद्धाच्या तयारीचे परीक्षण करण्यासाठी यूएसएस गेराल्ड फोर्ड या त्यांच्या एअरक्राफ्ट कॅरिअरजवळ समुद्रात 18000 किलोग्रॅम वजनाच्या बाँबची चाचणी केली. या स्फोटामुळे मोठा भूकंप झाला आहे.

USA Navy bomb test
अमेरिकेच्या नौदलाने फोडला 18 हजार किलोंचा महाकाय बाँब, समुद्रात झाला भीषण भूकंप  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अमेरिकी नौदलाने नव्या एअरक्राफ्ट कॅरिअरवर बाँबच्या परिणामाचा केला अभ्यास
  • अमेरिकेच्या नौदलाने समुद्राच्या आत केलेल्या भयंकर स्फोटाचा व्हिडिओ केला जारी
  • 18 हजार किलो वजनाचा हा महाकाय बाँब एअरक्राफ्ट कॅरिअरजवळ समुद्रात पाडला

वॉशिंग्टन: चीनच्या नौदलाच्या (Chinese navy) वाढत्या समुद्री ताकदीचा (naval strength) सामना करण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने (USA Army) आपल्या सर्वात नव्या एअरक्राफ्ट कॅरिअरवर (newest aircraft carrier) भयंकर बाँब हल्ल्याचा (bomb attack) परिणाम (effects) पाहण्यासाठी परीक्षण (test) केले. अमेरिकेच्या नौदलाने समुद्राच्या (sea) आत भयंकर स्फोटाचा (huge blast) व्हिडिओ (video) जारी केला आहे. साधारण 18 हजार किलोच्या या महाकाय बाँबचा स्फोट एअरक्राफ्ट कॅरिअर गेराल्ड फोर्डजवळ (Gerald Ford) समुद्रात पाडण्यात आला ज्यामुळे पाण्याच्या आत जोरदार स्फोट झाला आणि भूकंप (earthquake) झाला.

अमेरिकेच्या नौदलाने याला म्हटले फुल शिप शॉक ट्रायल

अमेरिकेच्या नौदलाने याला फुल शिप शॉक ट्रायल म्हटले आहे. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या स्फोटामुळे समुद्राच्या आत 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. अमेरिकेच्या नौदलाने गेल्या शुक्रवारी सांगितले की हे परीक्षण फ्लोरिडाच्या डायटोना समुद्रकिनाऱ्यापासून 100 मैल अंतरावर करण्यात आले. तज्ञांनी म्हटले आहे की अशाप्रकारचे परीक्षण ही एक असामान्य घटना आहे.

महास्फोटाचा व्हिडिओ आता झाला आहे व्हायरल

असे सांगितले जात आहे की अमेरिकेच्या नौदलाचे हे एअरक्राफ्ट कॅरिअर पाण्याच्या वर होते आणि या बाँबचा स्फोट पाण्याचा आत केला. या परीक्षणाबद्दल असे सांगितले जात आहे की अशा बाँबहल्ल्याच्या वेळी हे एअरक्राफ्ट कॅरिअर किती तणाव झेलू शकते आणि युद्धाच्या वेळी हे किती प्रभावी ठरू शकते हे तपासण्यासाठी हे परीक्षण केले गेले. यूएसजीएसने समुद्रात आलेल्या या भूकंपाची नोंद केली. या महास्फोटाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे आणि आत्तापर्यंत 30 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

पूर्णपणे सुरक्षित स्फोट असल्याचा अमेरिकेच्या नौदलाचा दावा

आता या बाँब विस्फोटाची चर्चा दूरदूरपर्यंत होत आहे, मात्र अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे की हा एक पूर्णपणे सुरक्षित विस्फोट होता. त्यांनी म्हटले आहे की या स्फोटातून एअरक्राफ्ट कॅरिअरच्या भविष्यातील युद्धाच्या शक्यता तपासल्या गेल्या. व्हिडिओत तीन प्रस्तावित स्फोटांबद्दल सांगितले गेले आहे. मात्र असा अंदाज व्यक्त केला जात आहे की फक्त दोन चाचण्या झाल्या आहेत. या स्फोटाचा पर्यावरणावहरही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी