Uttar Pradesh Azamgarh Crime News, Prince Yadav arrested, Police Found Girl Dead Body Parts : उत्तरप्रदेशमधील आझमगडमध्ये श्रद्धा मर्डर केसची पुनरावृत्ती म्हणावी अशी घटना घडली. एका विहिरीत महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आणि महिलेचे कपडे आढळले आहेत. या प्रकरणात प्रिन्स यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रिन्स यादवला आराधनासोबत लग्न करायचे होते. पण आराधनाचे लग्न झाले आणि ती पतीसोबत परदेशी गेली. प्रिन्सला हे सहन झाले नाही. लग्नानंतर काही महिन्यांनी आराधना मायदेशी परतली. आराधना घरी असल्याचे कळताच प्रिन्स तिला भेटण्यासाठी गेला. प्रिन्सने मंदिरात देवदर्शनाला जाऊ असे सांगून आराधनाला घरातून बाहेर आणले आणि तिची क्रूरपणे हत्या केली. या हत्येसाठी प्रिन्सने त्याच्या भावाची मदत घेतली. प्रिन्सने गळा दाबून आराधनाची हत्या केली. नंतर प्रिन्स आणि त्याच्या भावाने मिळून आराधनाच्या शरीराचे सहा तुकडे केले. हे तुकडे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून विहिरीत टाकले. नंतर आराधनाचे कपडे पण प्रिन्सने एका विहिरीत टाकले. आराधनाचे शिर धडापासून वेगळे करून ते एका तलावात टाकण्यात आले.
हत्येआधी प्रिन्स आराधनाला बाइकवरून एका मोकळ्या जागेवर घेऊन गेला. तिथेच प्रिन्सने तिची हत्या केली आणि भावाच्या मदतीने आराधनाच्या शरीराची विल्हेवाट लावली. या प्रकरणात पोलिसांनी प्रिन्स यादव याला अटक केली. पोलीस चौकशी दरम्यान आराधनाच्या हत्येसाठी आईवडील, चुलत भाऊ सर्वेश आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मदत केल्याचे प्रिन्सने कबुल केले.
Data Protection Bill : डेटा चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही, भरावा लागेल 500 कोटी रुपयांचा दंड
हत्येनंतर शरीराचे तुकडे करणे सोपे व्हावे यासाठी मृतदेह जवळच्या उसाच्या मळ्यात नेला. तिथेच भावाच्या मदतीने आराधनाच्या शरीराचे तुकडे केले. या कारवाईसाठी भाऊ साहित्य घेऊन आला होता, असेही प्रिन्सने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे. आराधना मर्डर केसचा तपास सुरू आहे. तपासातून काय घडले याबाबतची आणखी माहिती हाती येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.