Viral News: माहेरी जाण्याची मागणी पडली महागात, दारूच्या नशेत पत्नीचं नाक चावलं

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 25, 2019 | 20:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News: उत्तर प्रदेशात बायकोच्या माहेरी जाण्याच्या हट्टाचा राग बाळगून एकानं तिचे नाक चावले आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले आहे. पत्नीला तसेच रक्तबंबाळ परिस्थितीत सोडून संबंधित इसम पळून गेला आहे.

representative photo
पत्नीचे नाक चावून पती फरार (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातली एक अजब घटना समोर आली आहे. एकानं आपल्या बायकोच्या माहेरी जाण्याच्या हट्टाचा राग बाळगून तिचे नाक चावले आहे. अर्थात दारूच्या नशेत त्यानं हे कृत्य केलं आहे. पत्नीला तसंच रक्तबंबाळ परिस्थितीत सोडून संबंधित इसम पळून गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी फरार आहे. त्याची पत्नी आरती हिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. देशात वेगवेगळ्या कारणांनी महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. केवळ भारतातच नव्हे आशिया खंडात बांग्लादेश, पाकिस्तानमध्येही घरगुती हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. भारताची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्यामुळं भारतातील घटनांचा आकडा आणखी मोठा दिसत आहे. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी अशा घटनांकडे सरकारचे वारंवार लक्ष वेधले असून, चिंता व्यक्त केली आहे.

दारू पिऊन सातत्याने मारहाण

बरेलीतील घटने संदर्भात पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपी संजय कुमार आणि आरती या पती-पत्नींमध्ये वारंवार वाद होत होते. जवळच असलेल्या माहेरी जाण्यासाठी आरतीने संजयकडे आग्रह धरला होता. सोमवारी यावरून पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि संजयने आरतीचे नाक चावले. त्यानंतर तो घरातून पळून गेला. आरतीच्या बहिणीचा पती विनोदनं दिलेल्या माहितीनुसार, संजयने पत्नीचे दागिने गहाण ठेवून पैसे उधार घेतले होते. संजय सातत्यानं दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता. गेल्या दोन दिवसांपासून आरती आपली अवस्था आई-वडिलांना सांगण्यासाठी माहेरी जाण्याचा हट्ट धरत होती. पण, संजयने तिला अनुमती दिली नाही. सोमवारी सकाळी संजयने आरतीला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो दारू पिऊन आला होता. संजयनं आरतीला जखमी केलं होतं. ती केवळ आपल्या आई-वडिलांना भेटण्याची परवानगी मागत होती, अशी माहिती अधिक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले.

कृत्रिम नाक प्रत्यारोपण गरजेचे

या संदर्भात आरती आणि तिच्या कुटुंबियांकडून तक्रारीची पोलीस वाट पाहत असल्याचे पोलिस अधिक्षक जितेंद्रकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘प्रकरणाची पूर्ण चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. तत्पूर्वी, आरतीच्या नातेवाईकांनी संजयविरोधात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.’ आरतीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्या नाकाचे ऑपरेशन गरजेचे असल्याची माहिती दिली आहे. तिचे नाक पूर्णपणे डॅमेज झाले आहे. पण, चांगल्या सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये तिला कृत्रिम नाक बसवून नाक पूर्ववर होऊ शकते. हे ऑपरेशन खर्चिक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Viral News: माहेरी जाण्याची मागणी पडली महागात, दारूच्या नशेत पत्नीचं नाक चावलं Description: Viral News: उत्तर प्रदेशात बायकोच्या माहेरी जाण्याच्या हट्टाचा राग बाळगून एकानं तिचे नाक चावले आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले आहे. पत्नीला तसेच रक्तबंबाळ परिस्थितीत सोडून संबंधित इसम पळून गेला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles