अयोध्या कैंट नावाने ओळखले जाईल फैजाबाद स्टेशन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद रेल्वे स्टेशनचे नामांतर करत असल्याचे जाहीर केले.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath has taken the decision to rename Faizabad railway junction as Ayodhya Cantt
अयोध्या कैंट नावाने ओळखले जाईल फैजाबाद स्टेशन 
थोडं पण कामाचं
  • अयोध्या कैंट नावाने ओळखले जाईल फैजाबाद स्टेशन
  • इलाहाबादचे झाले प्रयागराज
  • मुगलसराय स्टेशन झाले दीनदयाळ उपाध्याय स्टेशन

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद रेल्वे स्टेशनचे नामांतर करत असल्याचे जाहीर केले. या संदर्भात लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे. भारत सरकारकडून आवश्यक ती परवानगी मिळाली असल्यामुळे लवकरच स्टेशनच्या नव्या नावाची अधिसूचना काढली जाईल. अधिसूचना प्रसिद्ध होताच फैजाबाद रेल्वे स्टेशनचे नाव अयोध्या कैंट (अयोध्या कॅन्टॉनमेंट/अयोध्या छावणी) असे होणार आहे; अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. Uttar Pradesh CM Yogi Adityanath has taken the decision to rename Faizabad railway junction as Ayodhya Cantt

याआधी फैजाबाद जिल्ह्याचे नामांतर अयोध्या जनपद (अयोध्या जिल्हा) असे करण्याचा तसेच जिल्हा मुख्यालय अयोध्या शहरात स्थलांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर प्रदेश सरकारने घेतला. हा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला. आता स्टेशनच्या नामांतराची अधिसूचना लवकरच काढणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

इलाहाबादचे झाले प्रयागराज

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर प्रदेश सरकारने इलाहाबाद जिल्ह्याचे नामांतर केले. हे नामांतर १६ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले. नामांतरानंतर जिल्ह्याचे नाव प्रयागराज असे झाले. सृष्टीची निर्मिती केल्यानंतर ब्रह्म देवाने पहिला (प्रथम - प्र) यज्ञ (याग) ज्या ठिकाणी केला तेच हे ठिकाण असल्याचे म्हणतात. यामुळेच या जिल्ह्याला प्रयागराज या नावाने ओळखण्याचा निर्णय झाला.

मुगलसराय स्टेशन झाले दीनदयाळ उपाध्याय स्टेशन

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर प्रदेश सरकारने मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नामांतर करण्याचा निर्णय जून २०१८ मध्ये अंमलात आणला. या निर्णयामुळे स्टेशनचे नाव पं. दीनदयाळ उपाध्याय स्टेशन असे झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी