Barabanki News: उभ्या असलेल्या बसनं दिली दुसऱ्या बसला धडक, 8 ठार; 35 हून अधिक जखमी

UP Accident News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यातून (Barabanki district) एक वाईट बातमी समोर येतेय.

Uttar pradesh accident
उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • या अपघातात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतेय.
  • जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये (Lucknow Trauma Center) उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेश: Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)  बाराबंकी जिल्ह्यातून (Barabanki district) एक वाईट बातमी समोर येतेय.  पूर्वांचल एक्सप्रेसवेवर सोमवारी पहाटे एक भीषण रस्ता अपघात (Horrific Road Accident) झाला. लोणीकत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ (Narendrapur Madraha village)  उभ्या असलेल्या बसला भरधाव वेगाने येणाऱ्या डबलडेकर बसने धडक दिली. या अपघातात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हैदरगड सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतेय. जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये (Lucknow Trauma Center) उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही डबलडेकर बस बिहारमधील सीतामढी आणि सुपौल येथून दिल्लीला जात होत्या त्यावेळी हा अपघात झाला. त्यानंतर पूर्वांचल द्रुतगती मार्गावर लोणीकत्रा पोलीस स्टेशन हद्दीतील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ दुसऱ्या बसने आधीच उभ्या असलेल्या डबलडेकर बसला धडक दिली.  अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या हैदरगड सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. सध्या पोलीस अपघाताच्या तपासात गुंतले आहे. मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा काम सुरू आहे.

अधिक वाचा-  Maharashtra Rains : पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भासह कोकणाला विशेष सुचना

असा घडला अपघात

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बस बिहारहून दिल्लीला जात होत्या, ज्यांचे क्रमांक UP 17 AT 1353 आणि UP 81 DT 1580 आहेत. त्यानंतर यूपीडीएच्या कॅन्टीनसमोरील पहिल्या डबलडेकरच्या चालकाने बस पार्किंगमध्ये न उभी करून महामार्गाच्या कडेला उभी केली होती. त्यामुळे मागून येणारी दुसरी व्होल्वो बस  धडकली. मागून आलेल्या बसमधील अधिक प्रवासी ठार आणि जखमी झाले, कारण आधी उभ्या असलेल्या बसमधील प्रवासी कॅन्टीनमध्ये गेले होते.

मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी जिल्ह्यातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या धडकेत 8 जणांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतानाच मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी