Uttar Pradesh News: मोबाईलवर गेम खेळण्यावरून ओरडले वडील, रागावलेल्या 9वी तल्या मुलानं उचललं धक्कादायक पाऊल

Uttar Pradesh 9th student hanged:वडील ओरडल्यानं रागावलेल्या 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं धक्कादायक पाऊल उचललं आहे.

Uttar pradesh news
9 वी तल्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
  • वडील ओरडल्यानं रागावलेल्या 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं धक्कादायक पाऊल उचललं आहे.
  • पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला.

उत्तर प्रदेश: Class 9 student Committed Suicide: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)  प्रयागराज (Prayagraj)  येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडील ओरडल्यानं रागावलेल्या 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं धक्कादायक पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी मुलाला मोबाईलवर गेम खेळण्यावरून ओरडले.  रात्री उशिरा वडिलांनी ओरडल्यानं विद्यार्थी रागावून खोलीत गेला आणि त्यानं पंख्याला गळफास (Hanging Himself) घेऊन आत्महत्या (Committed Suicide)  केली आहे. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.

घरच्यांनी सकाळी मुलाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ मुलगा दरवाजा उघडत नव्हता. त्यानंतर घरातल्यांनी खिडकीतून पाहिलं असता त्यांना धक्काच बसला. मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 

अधिक वाचा-  दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच, घुसखोरी करताच सुरक्षा दलांनी घेरलं

मुलाचे वडील रघुनाथ प्रसाद गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, ते रेल्वेत काम करतात. ते कर्नलगंज परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुलगे आहेत, त्यांपैकी धाकटा सच्चिदानंग BHS शाळेत इयत्ता 9 वीत शिकत होता. तो अभ्यासात लक्ष देत नव्हता. वारंवार मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळत असायचा.  मंगळवारी रात्री जेवतानाही तो मोबाईलवर गेम खेळत होता, त्यामुळे त्याला मोबाईल वापरावरून ओरडलो. 

ओरडल्यानं रागावलेला सच्चिदानंद न जेवता स्वतःच्या खोलीत गेला आणि आतमधून खोलीला कडी लावली. सकाळपर्यंत त्याचा राग शांत होऊन सर्व काही ठीक होईल, असं कुटुंबीयांना वाटलं. पण अशा गोष्टीसाठी सच्चिदानंद आत्महत्या करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हते. सकाळी मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबियांची दुरवस्था झाली आहे. वडील वारंवार म्हणत आहेत की, मुलाला ओरडलो नसतो तर अशी वेळ आली नसती. 

अधिक वाचा-  एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, खास शब्दात केलं Tweet

काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये एका मुलानं मोबाईलवर गेम खेळण्यास टोकल्यानं आईची हत्या केली होती. या घटनांमुळे प्रत्येक पालकाने सतर्क राहण्याची गरज आहे कारण कुठे ना कुठे मोबाईलच्या व्यसनाचा मुलांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी