चहा पित असताना रेस्टॉरंटमध्ये घुसून दोन पत्रकारांवर गोळीबार, बाईकस्वारांकडून जीवघेणा हल्ला

बाईकवरून आलेल्या हल्लेखोऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर दोन्ही पत्रकारांना उपचारासाठी वाराणसीला (Varanasi) दाखल करण्यात आलं आहे.

Crime News
दोन पत्रकारांवर गोळ्या झाडल्या 
थोडं पण कामाचं
  • दोन्ही पत्रकारांना उपचारासाठी वाराणसीला (Varanasi) दाखल करण्यात आलं आहे.
  • दोन पत्रकार रेस्टॉरंटमध्ये चहा घेत होते.
  • पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

उत्तर प्रदेश: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाईकस्वारांनी दोन पत्रकारांना (Two Journalists) गोळ्या घातल्या आहेत. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) सोनभद्रमध्ये  (Sonbhadra) ही घटना घडली आहे. दोन पत्रकार रेस्टॉरंटमध्ये चहा घेत होते. त्यावेळी बाईकवरून आलेल्या हल्लेखोऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर दोन्ही पत्रकारांना उपचारासाठी वाराणसीला (Varanasi) दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ही घटना सोनभद्र (Sonbhadra) येथील कालियारी मार्केटमधील (Kaliyari market)  असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही घटना सोनभद्रच्या रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कालियारी मार्केटमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एका स्थानिक वृत्तपत्रात काम करणाऱ्या दोन पत्रकारांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. श्याम सुंदर पांडे आणि लड्डू पांडे अशी दोन्ही पत्रकारांची नावं आहेत. दोघेही वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम करतात.

अधिक वाचा-  आजपासून मुंबईसह देशभरात सुरू होतेय मोफत Booster Dose मोहिम, जाणून घ्या 75 दिवसांत कोणाला घेता येणार डोस?

SHO प्रणव श्रीवास्तव यांनी या घटनेवर माहिती दिली आहे. श्रीवास्तव म्हणाले की,  श्याम सुंदर पांडे आणि लड्डू पांडे हे दोघेही कालियारी मार्केटमधील रेस्टॉरंटमध्ये चहा घेत होते. त्यानंतर बाईकवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. त्याचबरोबर दोन्ही पत्रकारांना चांगल्या उपचारासाठी वाराणसीला रेफर करण्यात आलं असल्याचं प्रणव श्रीवास्तव यांनी सांगितलं.

पत्रकारांवर दोन जणांनी हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनी श्याम सुंदर पांडे आणि लड्डू पांडे यांच्यावर गोळीबार केला. यावेळी श्याम सुंदर पांडे यांच्या हाताला गोळी लागली तर लड्डू पांडे यांच्या डोक्यात गोळी लागली. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी