Shocking! मुलीच्या मृतदेहासोबत एक महिना राहत होता निवृत्त पोलीस अधिकारी, असा झाला खुलासा

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 18, 2019 | 16:29 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं या पित्याने कुणालाही सांगितलं नव्हतं. तसेच हे दाम्पत्य आजुबाजुच्या नागरिकांसोबत जास्त बोलतही नसल्याची माहिती समोर आली आहे. पाहा नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण...

uttar pradesh ex police officer living daughter dead body
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथील हयात नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे राहणारा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आणि त्याची पत्नी हे दोघेही आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलावर सिद्दीकी यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने आजुबाजुच्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता घरातील एका खोलीत त्यांच्या मुलीचा मृतदेह आढळला. या मुलीचा मृत्यू दोन महिन्यांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस दलातून निवृत्त झालेले दिलावर सिद्दीकी हे आपली पत्नी, दोन मुलं आणि मुलीसह हयात नगर परिसरात राहत होते. दिलावर सिद्दीकी यांची दोन्ही मुलं शिक्षणासाठी दिल्लीत राहतात तर मुलगी दिलावर सिद्दीकी यांच्यासोबतच राहत होती. दिलावर सिद्दीकी यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचं दिलावर यांच्या कुटुंबियांनी कुणालाही सांगितलं नाही. तसेच सिद्दीकी हे नेहमी शांत राहत असत आणि शेजाऱ्यांसोबत बोलणं टाळत असतं. 

पोलीस अधिक्षक प्रकाश स्वरूप पांडेय यांनी आएएनएस न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, दिलावर सिद्दीकी यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली आणि त्यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस दिलावर यांच्या घरी दाखल झाले. आपल्या घरात काहीही झालं नसल्याचं यावेळी दिलावर याने पोलिसांना सांगितले. प्राथमिक तपासानुसार, दिलावर दाम्पत्य मानसिक रूग्ण असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळेच त्यांनी आपली मुलगी जिवंत असल्याचं समजून तिच्यासोबत राहत होते.

पोलिसांनी या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीतही घडली होती अशीच घटना

अशाच प्रकारची एक घटना गेल्यावर्षी दिल्लीत समोर आली होती. या घटनेत एक मनोरूग्ण महिला आपल्या मृत मुलासोबत राहत होती. त्या मुलाचे चाकूने तुकडे केलेले आढळले होते. या महिलेनेच आपल्या मुलाची हत्या केल्याच उघड झालं होतं. मुलाची हत्या करताना महिलेला सुद्धा दुखापत झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Shocking! मुलीच्या मृतदेहासोबत एक महिना राहत होता निवृत्त पोलीस अधिकारी, असा झाला खुलासा Description: आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं या पित्याने कुणालाही सांगितलं नव्हतं. तसेच हे दाम्पत्य आजुबाजुच्या नागरिकांसोबत जास्त बोलतही नसल्याची माहिती समोर आली आहे. पाहा नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल