Shri Krishna Janmabhoomi Case : ज्ञानवापीनंतर कृष्णभूमीचा वाद; श्रीकृष्ण जन्मभूमीवर शाही ईदगा, कोर्टाकडून याचिका मंजूर

मथुरा कोर्टाने आज श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भाती याचिका स्विकार केली आहे. मनीष यादव यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत श्रीकृष्ण जन्मभूमी वादग्रस्त जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, या जागेवर ईदगाह उभी आहे तिथे कृष्ण मंदिराचे गर्भगृह आहे.

mathura shri krishna janmabhoomi law suit
Breaking News : ज्ञानवापीनंतर कृष्णभूमीचा वाद;  श्रीकृष्ण जन्मभूमीवर शाही ईदगा, कोर्टाकडू याचिका मंजूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मथुरा कोर्टाने आज श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भाती याचिका स्विकार केली आहे.
  • मनीष यादव यांनी ही याचिका दाखल केली होती.
  • या याचिकेत श्रीकृष्ण जन्मभूमी वादग्रस्त जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती.

Shri Krishna Janmabhoomi Case:  लखनौ : मथुरा कोर्टाने आज श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भाती याचिका स्विकार केली आहे. मनीष यादव यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत श्रीकृष्ण जन्मभूमी वादग्रस्त जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, या जागेवर ईदगाह उभी आहे तिथे कृष्ण मंदिराचे गर्भगृह आहे. याच ठिकाणी सध्या नमाम पठण केले जात आहे. वादग्रस्त ठिकाणी उपस्थित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच या भागात सीसीटीव्ही लावण्या यावे अशी मागणी या याचिकेत केली आहे. कोर्टाने ही याचिका आज स्विकारली आहे. 

याचिकाकर्ते मनीष यादव यांनी याचिकेत मागणी केली आहे की या वादग्रस्त ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण केले जावे जेणेकरून सत्य परिस्थिती काय होती हे समजू शकेल. प्रतिपक्ष या भागातील पुरावे नष्ट करत आहेत असा आरोप यादव यांनी केला आहे. यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत अशी मागणी त्यांनी केली आहे, त्यामुळे साक्षी पुरावे सुरक्षित राहील असे यादव यांनी सांगितले आहे. कोर्टाने या प्रकरणी जिल्हा न्यायदंडाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सीआरपीएफला या प्रकरणी आदेश देण्याची मागणीही यादव यांनी केली आहे. या भागात ईदगाह असून इथे लोक नमाज पठण करतात या भागात भगवान कृष्ण मंदिराचा गर्भगृह आहे असा दावा याद यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी