Obscene Photo Viral : अश्लील फोटो झाले व्हायरल, तरुणीने उचलले धक्कादायक पाऊल

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीचे चार तरुणांनी अश्लील फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे तरुणीने धक्कादायक पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

obscene photo
अश्लील फोटो व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका २० वर्षीय तरुणीचे चार तरुणांनी अश्लील फोटो व्हायरल केले होते.
  • त्यामुळे तरुणीने धक्कादायक पाऊल उचलले.

Obscene Photo Viral : लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीचे चार तरुणांनी अश्लील फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे तरुणीने एक धक्कादायक पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित तरुणीने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. या प्रकरणी एका पोलीस शिपायाला निलंबीत करण्यात आले आहे. (uttar pradesh saharanpur 20 year old girl commit suicide after obscene photo viral four arrested one police constable suspended)

अधिक वाचा: नाशिकमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; पवन एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरल्याने या रेल्वे वाहतुकीवर परिणाम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या सहारनपूर शहरातील एका २० वर्षीय तरुणीचे मोहित, धीरज, वसीम आणि सलीम या चौघांनी मिळून अश्लील फोटो काढले. नंतर चारही जणांनी तिचे हे फोटो ऑनलाईन पोस्ट करून व्हायरल केले. पीडित मुलीला याबाबत कळाले तेव्हा ती घाबरून गेली पोलिसांत धाव घेतली. 

अधिक वाचा: मनसे इफेक्ट, घाटकोपरमध्ये लाऊडस्पीकरवरून 'हनुमान चालीसा' पठण

तरुणीने चारही जणांविरोधात तक्रार केली, परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. अखेर तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आणि मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपींची नावेही सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. 

अधिक वाचा: SSC-HSC Exam Result : विद्यार्थ्यांना जूनमध्ये मिळणार गुड न्यूज, या तारखेला लागणार निकाल

 तसेच तरुणीच्या सुसाईट नोटवरून चारही तरुणांना अटक केली. वेळीच कारवाई न केल्याने प्रशासनाने पोलीस शिपाई अतुल कुमार यांना निलंबीत केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

अधिक वाचा: बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही - चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी