Viral Video : कॉलेजच्या तरुणींसमोर ‘माकड’ उड्या मारणे पडले महागात, पोलिसांनी धरली गचांडी

कॉलेज बाहेर तरुणींसमोर माकड उड्या मारणे एका तरुणाला चांगले महागात पडले आहे. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. 

gaziabad person arrested
मुलींसमोर माकड उड्या मारणे पडले महागात 
थोडं पण कामाचं
  • कॉलेज बाहेर तरुणींसमोर माकड उड्या मारणे एका तरुणाला चांगले महागात पडले आहे.
  • या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. 

Viral Video : Ghaziabad : कॉलेज बाहेर तरुणींसमोर माकड उड्या मारणे एका तरुणाला चांगले महागात पडले आहे. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.  (Uttar pradesha ghaziabad man stunts in front girls college police arrested after video gone viral in social media)

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील सुशीला कॉले आहे. या कॉलेजच्या बाहेर जेव्हा विद्यार्थिनी जात होत्या तेव्हा एक तरुण उड्या मारत होता. इतकेच नाही तर या उड्या मारण्याचा व्हिडिओही शूट करून इन्स्टा रील्सवर टाकला होता. या व्हिडीओच्या बॅगरांऊड मध्ये कल कॉलेज बंद हो जाएगा असे गाणेही रीलमध्ये टाकले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, पोलिसांच्या निदर्शनास हा व्हिडीओ आल्यानंतर त्यांनी हा तरुण कोण आहे याचा शोध घेतला. तरुणाचे नाव दुष्यंत कुमार असल्याचे समोर आले तसेच दुष्यंत बुलंदशहरचा रशिवासी असल्याचे त्याने सांगितले. मुलींवर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना इम्प्रेस करण्यासाठी हा व्हिडीओ बनवल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दुष्यंत कुमार विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी