उत्तराखंडमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, २५ ठार

Uttarakhand bus carrying pilgrims fell into a gorge near Damta in Uttarkashi district : मध्यप्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील २८ भाविकांना जात असलेल्या बसला उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील दमटा येथे अपघात झाला. बस दरीत कोसळली. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

Uttarakhand bus carrying pilgrims fell into a gorge near Damta in Uttarkashi district
उत्तराखंडमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, २५ ठार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उत्तराखंडमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, २५ ठार
  • घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफची पथके पोहोचली
  • मदतकार्य सुरू

Uttarakhand bus carrying pilgrims fell into a gorge near Damta in Uttarkashi district : मध्यप्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील २८ भाविकांना जात असलेल्या बसला उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील दमटा येथे अपघात झाला. बस दरीत कोसळली. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफची पथके पोहोचली आहेत. मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मदतकार्याच्या ताज्या स्थितीची माहिती मध्यप्रदेश सरकारला दिली जात आहे. 

बस अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला. तसेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची माहिती घेतली. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताची माहिती मिळताच शोक व्यक्त केला. उत्तराखंडमध्ये झालेला बस अपघात ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. अपघातात ज्यांनी आपल्या आप्तस्वकियांना गमावले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. 

राज्य सरकार घटनास्थळी शक्य ती मदत पुरविण्यात गुंतले आहे. पीएमएनआरएफमधून अपघातात मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या नातलगास २-२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. जखमींना उपचारांसाठी ५०-५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अपघाताविषयी शोक व्यक्त करून मदतकार्याची माहिती दिली. तर मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अपघाताची माहिती मिळताच शोक व्यक्त केला. अपघाताता मृत्यू झालेल्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणले जाईल तसेच जखमींवर आवश्यक ते उपचार केले जातील, अशी ग्वाही मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी