देहराडून: Dehradun following continuous rains: उत्तराखंड राज्यात (Uttarakhand State) पावसानं (Rains) थैमान घातलं आहे. देहरादून (Dehradun) जिल्ह्यातल्या रायपूर (Raipur) ब्लॉकमध्ये आज सकाळी ढगफुटीची(cloudburst) घटना घडली आहे. या ढगफुटीचा व्हिडिओ समोर आला आहे. आज पहाटे 2.45 वाजता जिल्ह्यातील सरखेत गावात ढगफुटी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ढगफुटीची माहिती मिळताच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन पथक (Disaster Management Team) घटनास्थळी दाखल झाले. गावात अडकलेल्या सर्व लोकांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकानं दिली आहे.
दरम्यान काही नागरिकांना जवळच्या रिसॉर्टमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे देहराडूनमधील प्रसिद्ध टपकेश्वर महादेव मंदिराजवळून वाहणारी तमसा नदी दुथडी भरून वाहत आहे. तसंच या पावसामुळे माता वैष्णोदेवी गुहा योग मंदिर आणि टपकेश्वर महादेव यांच्यातील संपर्क ही तुटला आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मंदिराचे संस्थापक आचार्य बिपीन जोशी यांनी दिली आहे.
अधिक वाचा- मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला?, पाकमधून आलेल्या धमकीनं खळबळ
दरम्यान दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) कटरा येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित (Vaishnodevi Yatra temporarily stop) करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे आज सकाळी रियासी जिल्ह्यातील कटरा शहरातील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानक पूर आला.
#WATCH | River Tamasa in spate near Tapkeshwar Mahadev temple in Dehradun following continuous rains in the area#Uttarakhand pic.twitter.com/Okxa0otY7N — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 20, 2022
मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती पाहता माता वैष्णोदेवी मंदिरातील भाविकांची ये-जा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे 27,914 भक्तानी यात्रेसाठी नाव नोंदणी केली होती, त्यांना आता थांबवण्यात आले आहे. सध्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे.
श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डकडून माहिती देण्यात आली आहे की, मुसळधार पावसामुळे कटरा ते वैष्णोदेवी मंदिराकडे यात्रेकरूंची ये-जा थांबवण्यात आली आहे. खाली उतरणाऱ्या यात्रेकरूंना प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीस आणि सीआरपीएफला आधीच माहिती देण्यात आली आहे.
#WATCH | J&K: Heavy rainfall triggers flash floods near Vaishno Devi Shrine in Katra town in Reasi district pic.twitter.com/NhgxNjbV9x — ANI (@ANI) August 19, 2022
पूरस्थिती पाहता श्राइन बोर्डाचे कर्मचारी, पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या कडक देखरेखीखाली सांजीछत आणि नंतर कटरा या दिशेनं येणाऱ्या- जाणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जात आहे.