टाटा सुमो दरीत कोसळली, 12 ठार

Uttarakhand News Road Accident News Accident In Chamoli Uttarakhand : उत्तराखंडमध्ये टाटा सुमो दरीत कोसळली. हा अपघात चमोली जिल्ह्यातील जोशीमठ ब्लॉकमध्ये झाला.

Uttarakhand News Road Accident News Accident In Chamoli Uttarakhand
टाटा सुमो दरीत कोसळली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • टाटा सुमो दरीत कोसळली, 12 ठार
 • टाटा सुमोचे प्रचंड नुकसान झाले
 • अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू

Uttarakhand News Road Accident News Accident In Chamoli Uttarakhand : उत्तराखंडमध्ये टाटा सुमो दरीत कोसळली. हा अपघात चमोली जिल्ह्यातील जोशीमठ ब्लॉकमध्ये झाला. अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. उर्गम-पल्ला जखोला मोटर मार्ग येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि टाटा सुमो दरीत कोसळली. 

उंचावरून दरीत कोसळल्यामुळे टाटा सुमोचे प्रचंड नुकसान झाले. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. स्थानिक आणि पोलीस संयुक्तपणे मदतकार्य करत आहेत. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.

टाटा सुमोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते. काही प्रवासी टाटा सुमोच्या टपावर बसले होते. वाहन दरी शेजारच्या रस्त्यावरून जात होते त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर टाटा सुमो दरीत कोसळली. मदतकार्यासाठी एसडीआरएफचे पथक, पोलीस आणि स्थानिक घटनास्थळी पोहोचले आहेत. 

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताची माहिती मिळताच शोक व्यक्त केला आणि मदतकार्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून सूचना दिल्या.

जिओला पोर्ट करा, वापरा जिओ 5G सुपरफास्ट सेवा
सावरकरांविषयीची धक्कादायक माहिती

रस्ते अपघात

जगात दररोज किमान तीन ते साडेतीन हजार नागरिकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. दररोज किमान 10 लाख नागरिक रस्ते अपघातात जखमी होतात. यापैकी काही मर्यादीत काळासाठी तर काही कायमचे दिव्यांग होतात. मुले आणि वृद्ध यांना अपघाताचा सर्वात जास्त धोका असल्याचे आकडेवारी सांगते. प्रगत देशांमध्ये चार चाकी वाहनांचे आणि विकसनशील देशांमध्ये दुचाकींचे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे, वाहन (कार) चालविताना बेल्ट वापरणे तसेच कोणतेही वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अपघात टाळू शकते. पण अनेकदा याच बाबतीत हलगर्जीपणा होतो आणि अपघात घडतो. वाहनाची देखभाल दुरुस्ती वेळेवर करणे आवश्यक असते. नाही तर ही कळत नकळत झालेली चूक पण अपघाताचे कारण ठरू शकते.

वाहतूक सुरक्षा

विदयार्थ्‍यांना वाहतूक नियमांबददल, अपघातास कारणीभूत घटक व सुरक्षात्‍मक उपाय योजनेची व अपघात झाल्‍यास प्राथमिक उपचाराची सक्‍तीची माहिती देणे. व्‍यवस्थित निगा राखलेल्‍या वाहनातच वाहन चालविणे शिकविणे.

 1. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर
 2. चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्‍ट लावणे
 3. वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे
 4. रस्‍त्‍यांना अनुसरुन योग्‍य डिझााईनचे वाहन निवडणे
 5. वाहनांची दारे व्‍यवस्थित बंद होतात व इतर यंत्रणा व्‍यवस्थित असल्‍याची खात्री करणे
 6. वाहन चालवताना मदय व अमली पदार्थाचा वापर टाळणे.
 7. रस्‍ते व्‍यवस्थित ठेवणे
 8. नियमित खड्डे बुजविणे
 9. योग्‍य गती मर्यादा पाळणे
 10. धोक्‍याच्‍या वळणाच्‍या ठिकाणी फलक लावणे आदी
 11. वाहतुक नियम सक्‍तीने लागू करणे व त्‍यांचे पालन करणे
 12. अपघात झाल्‍यास प्राथमिक चिकित्‍सा व तत्‍काळ सेवा उपलब्‍ध करुन देणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी