Vaccination crosses 156 crore mark : भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणारने ओलांडला १५६ कोटींचा टप्पा

Vaccination crosses 156 crore mark in India : भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणारने १५६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज ५६ कोटी १४ लाख ५६ हजार ५७३ कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आल्या.

Vaccination crosses 156 crore mark in India
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणारने ओलांडला १५६ कोटींचा टप्पा 
थोडं पण कामाचं
  • भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणारने ओलांडला १५६ कोटींचा टप्पा
  • ९० कोटी ६१ लाख ८२ हजार २८२ जणांना लसचा पहिला डोस तर ६५ कोटी १४ लाख ५२ हजार ५१ जणांना लसचा दुसरा डोस टोचला
  • ३८ लाख २२ हजार २४० जणांना लसचा प्रिकॉशनरी डोस (खबरदारीचा डोस) टोचला

Vaccination crosses 156 crore mark in India : नवी दिल्ली : भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणारने १५६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज ५६ कोटी १४ लाख ५६ हजार ५७३ कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आल्या. देशातील ९० कोटी ६१ लाख ८२ हजार २८२ जणांना लसचा पहिला डोस तर ६५ कोटी १४ लाख ५२ हजार ५१ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. देशातील ३८ लाख २२ हजार २४० जणांना लसचा प्रिकॉशनरी डोस (खबरदारीचा डोस) टोचण्यात आला. 

भारतात १५ ते १७ वयोगटातील ३ कोटी ४२ लाख ८४ हजार ३९६ मुलांना लसचा पहिला डोस टोचण्यात आला. देशातील ५९ कोटी ८० लाख २१ हजार ४० जणांना लसचा पहिला डोस तर ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार ४७१ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. 

देशात सर्वाधिक लसीकरण अनुक्रमे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार या पाच राज्यांमध्ये झाले. उत्तर प्रदेशमध्ये २२ कोटी ६२ लाख २६ हजार ३१७ लसचे डोस टोचण्यात आले. महाराष्ट्रात १४ कोटी २६ लाख २२ हजार ८६१ लसचे डोस टोचण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये ११ कोटी ३२ लाख ९८ हजार २२० लसचे डोस टोचण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये १० कोटी ७० लाख ४ हजार ५८१ लसचे डोस टोचण्यात आले. बिहारमध्ये १० कोटी ६४ लाख ४५ हजार ५११ लसचे डोस टोचण्यात आले. 

भारतात १४ लाख १७ हजार ७९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ६८ लाख ५० हजार ९६२ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४९ लाख ४७ हजार ३९० जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ८५ हजार ७८० मृत्यू झाले.

जगात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अनुक्रमे अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, इटली आणि भारत या सहा देशांमध्ये आहेत. अमेरिकेत २ कोटी २३ लाख १७ हजार ५२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. फ्रान्समध्ये ४४ लाख ८१ हजार ३०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. इंग्लंडमध्ये ३७ लाख ६ हजार ८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. स्पेनमध्ये २७ लाख ५२ हजार ९०५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. इटलीत २३ लाख ९८ हजार ८२८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी