कानपूरमध्ये दोन वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 10, 2021 | 15:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

कानपूरमध्ये भारत बायोटेकच्या स्वदेशी लस कोवॅक्सिनची चाचणी छोट्या मुलांवर सुरू केली आहे. मुलांना तीन ग्रुपमध्ये विभागून या लसीची चाचणी घेतली जात आहे. 

corona vaccine
कानपूरमध्ये दोन वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी 

थोडं पण कामाचं

  • जगभरात आतापर्यंत इतक्या लहान मुलांवर नाही झाली चाचणी
  • भारतात पहिल्यांदा मुलांवर होतेय चाचणी
  • कोरोना लसीच्या चाचणीचे सकारात्मक निकाल येत आहेत.

कानपूर:  कोरोना व्हायरसची तिसरी लाट(third wave of corona) मुलांसाठी धोकादायक सांगितली जात आहे. तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची(corona vaccine trial) चाचणी केली जात आहे. आतापर्यंत जगात कोठेच इतक्या लहान मुलांवर ही चाचणी करण्यात आलेली नाही. मुलांना तीन गटात विभागून लसीची चाचणी कानपूरममध्ये(kanpur) केली जात आहे. याचे सकारात्मक निकाल समोर आले आहेत. Vaccine trial on two years childrens in kanpur

भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची चाचणी मुलांवर सुरू करण्यात आली आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये गेल्या मंगळवारपासून ही चाचणी करण्यात आली होती. लसीच्या चाचणीदरम्यान मुलांना तीन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटात दोन ते सहा वर्षीय मुले, दुसऱ्या गटात ६ ते १२ वर्षीय आणि तिसऱ्या गटात १२ ते १८ वर्षाच्या मुलांना ठेवण्यात आले. 

अशी झाली लसीची चाचणी

लसीच्या चाचणीच्या पहिल्या दिवशी १२ ते १८ वर्षाच्या ४० मुलांचे स्क्रीनिंग करण्यात आले. यात २० मुले लसीसाठी फिट आढळली. त्या मुलांना लस देण्यात आली. गेल्या बुधवारी सहा ते १२ वर्षातील १० मुलांचे मेडिकल चेकअप करण्यात आले. यात लसीसाठी ५ मुले योग्य ठरली. त्यांना लस देण्यात. यानंतर या मुलांना ४५ मिनिटांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. यात दोन मुलांना इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी हलक्या लाल रंगाचे निशाण आले. ही गोष्ट सामान्य आहे. 

जगात इतक्या लहान मुलांवर परिणाम

लसीच्या चाचणीचे प्रमुख बाल रोग तज्ञ प्रोफेसर व्हीएन त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की दोन वर्षांच्या मुलांवर लसीची चाचणी ही जगातील पहिली चाचणी आहे. इतक्या लहान मुलांवर कोरोनाची चाचणी झालेली नाही. कानपूरमध्येही या आधी कोरोना लसीची चाचणी करण्यात आलेली आहे. रशियाची लस स्पुटनिक व्ही आणि झायडस कॅडिलाची चाचणी झालेली आहे. लस बनवणाऱ्या इतर कंपन्याही चाचणी करण्याबाबत विचार करत आहेत. कोवॅक्सीनच्या नेझल स्प्रे पुढील महिन्यात येणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी