Valentine Day Celebration Accident 2023 in Marathi: गोव्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गेलेल्या एका कपलचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रेमी जोडपं आपल्या कुटुंबीयांना न सांगताच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते. मंगळवारी संध्याकाळच्या सुामरास दोघेही गोव्यातील पालोलेम बीच (palolem beach) वर गेले होते. त्याच दरम्यान दोघांचाही समुद्रात बुडून मृत्यू झाला. समुद्रकिनाऱ्यावर एका पुरुषाचा आणि एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, नंतर या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
सुप्रिया दुबे (26 वर्षे) आणि विभू शर्मा (27 वर्षे) अशी मृतकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही उत्तरप्रदेशातील निवासी असल्याची माहिती आहे. समुद्रात दोन जण बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लाईफगार्डच्या मदतीने मृतदेह समुद्रातून बाहेर काढले.
हे पण वाचा : पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं? जाणून घ्या
पोलिसांनी सांगितले की, सुप्रिया आणि वभू हे दोघेही उत्तरप्रदेशातील निवासी आहेत. ते सुट्टीत गोव्याला फिरण्यासाठी आले होते. मात्र, पालोलेम बीचवर बुडून त्यांचा मृत्यू झाला. सध्या सुप्रिया बंगळुरू येथे वास्तव्य करत होती तर विभू हा दिल्लीत राहत होता.
हे पण वाचा : या कारणांमुळे होतो गर्भपात
पोलिसांनी सांगितले की, सुप्रिया आणि विभू हे नातेवाईक होते. या दोघांच्याही कुटुंबीयांना याची माहिती नव्हती की, सुप्रिया-विभू हे गोव्यात फिरण्यासाठी गेले आहेत. पोलिसांच्या मते, हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक लोकांनी या दोघांना पालोलेम बीचवर एकत्र फिरताना पाहिले होते.
हे पण वाचा : LIC पॉलिसीमध्ये मुलांच्या नावे 150 रुपये गुंतवा अन् मोठा परतावा मिळवा
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया आणि विभू हे दक्षिण गोव्यातील कैनाकोना तालुक्यात असलेल्या पालोलेम समुद्र किनाऱ्यावर केले होते. ज्या रात्री ही घटना घडली त्यावेळी हे दोघेही नशेत असल्याचं वृत्त समोर येत आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या हॉटेलमध्ये या दोघांनीही चेक-इन केलं होतं तेथील कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या मते, बीचवर जाण्यापूर्वी दोघांनी डिनर आणि ड्रिंक केलं होतं.