'असा विचार म्हणजे मूर्खपणा की देशद्रोह...' वरुण गांधींनी कंगना रनौतला सुनावलं, टीका होताच कंगनानं केलं दुसरं ट्विट

Varun Gandhi Criticized Kangana Ranaut :  भाजपची समर्थक (BJP supporter) म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौतला (Actress Kangana Ranaut) भाजप खासदार वरुण गांधींनी (BJP MP Varun Gandhi) ट्विटवर खडेबोल सुनावले आहेत.

Varun Gandhi criticized Kangana Ranaut
भाजप खासदार वरुण गांधींनी कंगना रनौतला ट्विटरवर सुनावलं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं. - कंगना रनौत
  • कंगनाचे या विचारांना मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह - वरुण गांधी
  • वरुण गांधींच्या या ट्वीटला कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर लगेच प्रत्युत्तर दिलं.

Varun Gandhi Criticized Kangana Ranaut :  मुंबई : भाजपची समर्थक (BJP supporter) म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौतला (Actress Kangana Ranaut) भाजप खासदार वरुण गांधींनी (BJP MP Varun Gandhi) ट्विटवर खडेबोल सुनावले आहेत. नेहमी वादाच्या आधारे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याचं कारण आहे, तिने भारताच्या स्वातंत्र्याविषयी केलेलं विधान. टाइम्स नाऊच्या समिट या कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली की, 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं. त्याला उत्तर देताना भाजपचे खासदार वरुण गांधींनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. 

कंगनाचे या विचारांना मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह असा सवाल त्यांनी विचारला होता. आता कंगनानेही त्यांना प्रत्युत्तर दिले असून गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक दिली असल्याचे तिने म्हटले आहे. एका मुलाखतील बोलताना कंगना रनौत म्हणाली होती की, देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर निवडून आल्यावर मिळाले. 1947 मध्ये अनेक दशकांच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षानंतर जे मिळाले ते म्हणजे “भीक” होती. कंगनाच्या या वक्तव्याला उत्तर देताना भाजप नेते वरुण गांधी यांनी तिच्यावर टीका केली. वरुण गांधींनी एक ट्वीट करत म्हटले आहे की, "कधी महात्मा गांधींच्या तपस्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र आणि लाखो स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाचा तिरस्कार केला आहे. या विचाराला मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह?"

वरुण गांधींच्या या ट्वीटला कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ती म्हणते की, "मी सांगितलं आहे की 1857 मध्ये स्वातंत्र्याची पहिली लढाई झाली, ती दाबण्यात आली. त्यानंतर ब्रिटिशांनी आपले अत्याचार आणि क्रुरता वाढवली. त्यानंतर गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक मिळाली."

दरम्यान, वरुण गांधी अलीकडे भाजपं पक्षापासून वेगळी भूमिका घेत अनेकदा त्यांची मतं मांडतायेत. काँग्रेस पक्ष चालवणाऱ्या नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्य, वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधीनी 2004 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये सामील झाले. मात्र, अलिकडे दोघेही भाजप विरोधात वक्तव्य करतांना दिसतात.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी