Gujarat Drugs Case : तब्बल 350 कोटींच्या ड्रग्जसह महाराष्ट्रातल्या भाजी विक्रेत्याला गुजरातमध्ये अटक; पाकिस्तान कनेक्शनही उघड

Gujarat Drugs Case : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) ड्रग्जवरुन (Drugs) रणकंद सुरू आहे. ड्रग्जच्या नावाखाली महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) करण्यात येत आहे.

Vegetable seller from Maharashtra arrested in Gujarat with 350 kg of drugs
महाराष्ट्रातील भाजी विक्रेत्याची गुजरातमध्ये ड्रग्ज विक्री   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडेतीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त
  • शहजादला याआधी हत्येच्या गुन्ह्याखाली शिक्षा झाली होती.
  • ४४ वर्षीय आरोपी शहजाद महाराष्ट्रातील ठाण्याचा रहिवासी आहे.

Gujarat Drugs Case : द्वारका:  महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) ड्रग्जवरुन (Drugs) रणकंद सुरू आहे. ड्रग्जच्या नावाखाली महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) करण्यात येत आहे. अशात गुजरातमधील (Gujarat) द्वारकाच्या (Dwarka) खंभालिया परिसरात तब्बल साडेतीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हा आरोपी महाराष्ट्राचा असून मुंब्र्याचा रहिवाशी आहे. विशेष म्हणजे हा भाजीविक्रेता आहे. यामुळे या प्रकरणावरून परत एका राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. 

देवभूमी द्वारका पोलिसांनी ही करवाई केली असून आरोपीकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत 350 कोटी इतकी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १९ पाकिटं जप्त केली आहेत. याशिवाय अजून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे ४७ पाकिटे सापडली आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. आजच्या कारवाईनंतर राजकोट रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीप मिळाल्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि स्थानिक गुन्हे शाखेने एकत्र कारवाई करत शहजाद घोषी या व्यक्तीला आराधना धाम येथून ताब्यात घेतले.

“४४ वर्षीय आरोपी शहजाद महाराष्ट्रातील ठाण्याचा रहिवासी आहे. तीन दिवसांपूर्वी तो खंभालिया येथे आला होता आणि आरती गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता. त्याची हालचाल संशयास्पद असल्याचे आम्हाला आमच्या सूत्राने सांगितले होते. ड्रग्ज मिळाल्यानंतर पुन्हा ठाण्याला जाण्यासाठी तो बसची वाट पाहत असताना आम्ही त्याला ताब्यात घेतले'. वांकानेर रस्त्यावर सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली.  या आरोपीकडून दोन बॅग जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बॅगमध्ये 15 किलो तर दुसऱ्या बॅगमध्ये 45 किलो ड्रग्ज होतं.  “प्राथमिक माहितीनुसार, शहजादला याआधी हत्येच्या गुन्ह्याखाली शिक्षा झाली होती. आम्ही त्याबद्दल अधिक माहिती घेत आहोत. ही तस्करी पाकिस्तानमधून समुद्रामार्गे झाल्याचा आम्हाला संशय आहे,” असं संदीप सिंह यांनी सांगितलं आहे.

350 कोटींचं ड्रग्ज -

गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जवळपास 16 किलो हेरॉईन जप्त केले आहे. हेरॉईनसोबत 66 किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आलं आहे. याची किंमत जवळपास 350 कोटी रुपये असल्याचं समजतेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे येत होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड मारत ड्रग्ज जप्त केलं. 

काय आहे पाकिस्तान कनेक्शन 

धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्जची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी गुजरात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. शेहजाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या तिघांना गुजरात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील शेहजाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. शेहजाद हा भाजीपाल्याचा विक्रेता असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र कनेक्शन लागल्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना देवभूमी द्वारकाचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी म्हणाले की, “मंगळवारी सकाळी ११ वाजता शहजादला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर रात्रीपर्यंत जप्तीची कारवाई तसेच पंचनामा करण्याचे काम सुरू होते. फॉरेन्सिक टीमने हेरोईन आणि मेफेड्रोन असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला”. शहजादच्या चौकशीनंतर अजून दोघांना देवभूमी द्वारकामधून अटक करण्यात आली. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी