Ram Mandir in Ayodhya: असं असेल अयोध्येतलं राम मंदिर, किती मजली असेल मंदिर जाणून घ्या

अयोध्यामध्ये राम जन्मभूमी- बाबरी मशीद विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ram Mandir Ayodhya
Ram Mandir in Ayodhya: असं असेल अयोध्येतलं राम मंदिर 

अयोध्यामध्ये राम जन्मभूमी- बाबरी मशीद वादग्रस्त प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रामलल्ला वादग्रस्त जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी बोर्डाला दुसरी पर्यायी जागा मशीदीसाठी दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर अयोध्येत वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाच्या पाच न्यायाधीशांनी अयोध्या प्रकरणात निकाल दिला. या न्यायाधीशांमध्ये न्यायाधीश रंजन गोगोई, मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एसए बोबडे), न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. जाणून घेऊया कसं असेल अयोध्येत बनणारे राम मंदिर. 

वादग्रस्त जमिनीवर रामलल्लाचा विजय झाला आहे. दरम्यान येथे बनणाऱ्या राम मंदिराची एकूण लांबी 270 फूट आणि रूंदी 132 फूट असेल. मंदिराच्या पृष्ठभागावर रामलल्ला विराजमान होतील आणि पहिल्या मजल्यावर श्री रामाचं दरबार असेल. मंदिरात एकूण 212 खांब बनवले जातील आणि प्रत्येकावर सोळा मूर्ती कोरल्या जातील. मंदिरात एकूण 24 दरवाजे असतील. चौकट संगमरवराची असेल. 

या मंदिरात 128 फूट ऊंच आणि दहा फूट रूंद परिक्रमा मार्ग असेल. पूर्ण मंदिर राजस्थानमधील भरतपुरच्या हलक्या गुलाबी रंग असलेल्या वाळूच्या खडकानं बनवण्यात येईल. 24 दरवाजे राजस्थानच्या संगमरवराच्या दगडानं बनतील. मंदिरात एकूण एक लाख 75 हजार घनफूट दगडांचा वापर केला जाईल. या मंदिराच्या आकर्षणाचा बिंदू म्हणजे हे मंदिर दुमजली असेल, त्यात कुठेही लोखंडाचा वापर केला जाणार नाही. 

मंदिराच्या खालच्या भागात 106 खांब असून ते तयार आहेत. 106 खांब वरच्या बाजूसही असतील. प्रत्येक खांब्यावर 16-16 मूर्ती बनवण्यात येतील. अयोध्यामध्ये 1990 पासून दगडावर कोरीव काम कार्यशाळेत सुरू आहे. एवढंच नाही तर राजस्थानच्या पीडवाडा आणि मकरानामध्ये ही राम मंदिराची कार्यशाळा फेब्रुवारी 1996 पासून सुरू आहे. पाषाण कोरीव काम 65 टक्के पूर्ण झाले आहे.

अयोध्या विवादाचा पाया 1528 साली सुरू झाला, तेव्हा येथे मुगल शासक बाबरनं बाबरी मशिदीची निर्माती केली. हिंदूकडून सांगण्यात आलं आहे की, मशीद ज्या स्थळावर बनवण्यात आली जिथे रामाचं जन्मस्थान होतं. हिंदू- मुस्लिम यांच्यातलं तणावातलं हे एक कारण आहे. या वादामुळे बऱ्याचंदा दंगली उसळल्या. स्वातंत्र्यानंतरही हा वाद कायम वाढत गेला. 1949 मध्ये येथे मशिदीमध्ये भगवान रामाची मूर्ती सापडली गेली. ज्यामुळेही तणाव वाढला गेला. पुन्हा त्यानंतर 1992 हजारो कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली, ज्याने देशभर दंगली झाल्या आणि 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...