Ayodhya case: शांतता भंग केल्यानं महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल, दोघांना अटक

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निकाल देणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोशल मीडियावर अफवा पसरवू नये असं नागरिकांना आवाहन केलं.

Verdict on ayodhya
शांतता भंग केल्यानं धुळ्यात पहिला गुन्हा दाखल, दोघांना अटक 

थोडं पण कामाचं

  • अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निकाल देणार आहे.
  • या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • सोशल मीडियावर अफवा पसरवू नये असं नागरिकांना आवाहन केलं आहे.

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निकाल देणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर अफवा पसरवू नये असं नागरिकांना आवाहन केलं असताना धुळ्यात या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धुळ्यातील गोरक्षक संजय रामेश्वर शर्मा या नावाच्या व्यक्तीनं फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती.  राम जन्मभूमी, बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाचा अंति निकाल जाहीर होणार असल्याच्या अनुषंगानं त्याचे संजय शर्मा या नावाचे फेसबुक अकाऊंटवरून श्री राम मंदिर भुमीस न्याय मिळताच मी दिपावळी साजरी करणार एक कलंक मिटेल इतिहासाचा..अशी मराठीत पोस्ट केली. या पोस्टमुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेश भावना आणि तेढ निर्माण करण्याचे हेतूनं प्रयत्न केलेत. या प्रकरणी संजय शर्माला अटक केली आहे. संजय शर्माविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Social media dhule

तर दुसरीकडे आणखी एका आरोपीनं काही दुकानांच्या भिंतीवर ऑइल पेंटनं जय श्रीराम असं लिहित शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. धुळे शहरातल्या जुन्या आग्रा रोडवरील त्यानं हे कृत्य केलं आहे. धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजेंद्र मराठेलाही अटक करण्यात आली आहे.  

crime

धुळे पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये, समाज माध्यमातून कुठल्याही जाती, धर्माविषयी आक्षेपार्ह टिपणी, व्हिडिओ, संदेश पोस्ट करून नये असं आवाहन केलं आहे. तसंच धुळ्यात 20 नोव्हेंबरपर्यंत कलम 144 (1)(3) लागू करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...