Vice President Election : जगदीप धनखर होणार नवे उपराष्ट्रपती, विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव

Vice President Election : देशाच्या पुढील उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांचा विजय झाला आहे. त्यांची विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्याशी लढत झाली.

Vice President Election : Jagdeep Dhankhar will be the new Vice President, defeating the opposition candidate Alva
Vice President Election : जगदीप धनखर होणार नवे उपराष्ट्रपती, विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उपराष्ट्रपती निवडणुकीत जगदीप धनखर यांचा जबरदस्त विजय
  • जगदीप धनखर यांना ५२८ मते मिळाली आहेत.
  • विरोधी पक्षाकडून या पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली.

Vice President Election : देशाच्या उपराष्ट्रपती निवडणुकीचे निकाल आले आहेत. या निकालांमध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर विजयी झाले आहेत. या पदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर आणि विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होती. दोन्ही सभागृहात एनडीएची मजबूत स्थिती पाहता धनखर यांचा विजय आधीच निश्चित होता. (Vice President Election : Jagdeep Dhankhar will be the new Vice President, defeating the opposition candidate Alva)

अधिक वाचा : Woman Suicide : पंजाबी महिलेची अमेरिकेत आत्महत्या, मरण्यापूर्वी रेकॉर्ड केला ‘हा’ व्हिडिओ

देशाच्या पुढील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निकालांमध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना ५२८ मते मिळाली आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षाकडून या पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. तर 15 मते रद्द करण्यात आली आहेत.


 
शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 93 टक्के मतदान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५० हून अधिक खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 780 खासदारांपैकी 725 खासदारांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले. तृणमूल काँग्रेसने याआधीच मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, त्याचे दोन खासदार शिशिर कुमार अधिकारी आणि दिव्येंदू अधिकारी यांनी मतदान केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी