VP Venkaiah Naidu : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरून दिली माहिती

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांना कोरोनाची लागण झाली आहे. नायडू सध्या हैद्राबादमध्ये असून कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते एक आठवड्यासाठी आयसोलेट झाले आहेत.

थोडं पण कामाचं
  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांना कोरोनाची लागण
  • नायडू सध्या हैद्राबादमध्ये
  • कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते एक आठवड्यासाठी आयसोलेट झाले आहेत

VP Venkaiah Naidu : नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांना कोरोनाची लागण झाली आहे. नायडू सध्या हैद्राबादमध्ये असून कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते एक आठवड्यासाठी आयसोलेट झाले आहेत. जे जे नायडू यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी संसदेतील ४०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. ४ ते ८ जानेवारीदरम्यान राज्यसभा सचिवालयायाच्या ६५, लोकसभा सचिवालयाचे २०० आणि इतर सेवेतील १३३ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी महासचिव पीसी मोदी आणि सल्लागार डॉ.पीपी रामाचार्युलू यांच्याशी चर्चा केली होती. नायडू यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचे निर्देश दिले होते. वेळ पडली तर कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत करावी असेही नायडू यांनी म्हटले होते. सर्व कर्मचार्‍यांना कोरोनासंबंधित नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. जे लोक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत त्यांना आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक अधिकारीही सध्या आयसोलेशनमध्ये होते.
 
 

सहा केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सहा केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ, पराराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांना चार जानेवारी कोरोनाची लागण झाली होती. २ जानेवारीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करावी असे आवाहन त्यांनी केले होते. तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली होते. केरळच्या कझीकोडे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी