ती बाथरूममध्ये आंघोळ करायची तेव्हा त्याचा 'हा' उद्योग सुरू असायचा

Haryana Crime News : जिंदमधील सफिदोन सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गावात एका महिलेचा बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे.

Video made of woman taking bath with mobile phone behind brick in wall in Harayana
ती बाथरूममध्ये आंघोळ करायची तेव्हा त्याचा 'हा' उद्योग सुरू असायचा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बाथरुमध्ये अंघोळ करताना व्हिडिओ बनवला
  • महिलेचे लक्ष भिंतीतून बाहेर पडलेल्या विटेकडे गेले,
  • मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होता व्हिडिओ, मग...

Crime News : हरियाणाच्या जिंदमधील सफिदोन सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातीलच तरुणाविरुद्ध अश्लील कृत्य आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Video made of woman taking bath with mobile phone behind brick in wall in Harayana)

अधिक वाचा : BIG BREAKING: एनएसई फोन टॅपिंग प्रकरण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे की, ती आंघोळ करत असताना तिचे लक्ष बाथरूमच्या भिंतीवरून काढलेल्या विटेकडे गेले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मोबाइल तेथे ठेवल्याचे पाहिले. ते पाहिल्यानंतर मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असल्याचे आढळून आले.

अधिक वाचा : 'वर्षभरापूर्वीच शिवसेना-भाजप युतीबाबत उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर झालेली चर्चा', शेवाळेंचा गौप्यस्फोट

शेजारी व्हिडिओ बनवायला निघाला

पोलिस अधिकारी अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या पतीला याबाबत माहिती दिली आणि फोन तपासल्यानंतर तो शेजारी रिंकूचा असल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या पतीने विरोध केला असता आरोपीने तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिंकूविरुद्ध अश्लील कृत्य आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : Agnipath Controversy : ‘अग्निपथ’वरून भाजपमध्ये गृहयुद्ध, आता जात पाहून सैनिक निवडणार का? वरुण गांधींचा सवाल

हिसारमध्येही अशा घटना घडल्या आहेत
याआधी हरियाणातील हिस्सारमध्ये एका महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली आणि सांगितले की, आरोपीने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी