नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते (Congress leader) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नाईट क्लबमधील (Nightclub) व्हिडिओ भाजप (BJP) नेत्यांकडून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाइट क्लबमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओनंतर युजर्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप समर्थकांकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी काठमांडूच्या नाईट क्लबमध्ये उपस्थित होते का? भाजपचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करून निशाणा साधला आहे. अमित मालवीय यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई संकटात असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. ते अशा वेळी एका नाईट क्लबमध्ये आहे जेव्हा त्याच्या पक्षात मोठ्या घडामोडी होत आहेत, अशा शब्दाता मालवीय यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे.
परंतु काही युजर्सकडून मालवीय याच्या टीकेचा समाचार घेण्यात आला आहे. खासगी आयुष्यात इतरांनी दखल देण्याचे कारण काय असा सवालही युजर्सकडून उपस्थित करण्यात येत आहे. राहुल गांधी हे आपल्या एका मैत्रिणीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी यांची मैत्रिण सुमनिमा उदास ही एका आंतरराष्ट्रीय वृ्त्तसंस्थेत पत्रकार म्हणून कार्यरत होती. सुमानिमाच्या वडिलांनी नेपाळचे राजदूत म्हणून म्यानमारमध्ये जबाबदारी पार पाडली. राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती या विवाह सोहळ्यात दाखल होणार आहेत.
राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपशी संबंधित राजकीय नेते, उजव्या विचारसरणीला पाठिंबा असणाऱ्या युजर्सकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, ही महिला राहुल गांधी यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिण असल्याचे दावा एका फोटोच्या आधारे केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी सोमवारी नेपाळला रवाना झाले होते आणि ते एका खासगी पार्टीत सहभागी होणार होते असे सांगितले जात आहे. दरम्यान भाजपने ज्या नाईट क्लबचा व्हिडीओ जारी केला आहे तो तेथील प्रसिद्ध क्लब आहे. हा दौरा राहुल गांधीचा वैयक्तिक आहे, हे ठीक आहे, असे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. परंतु पण प्रश्न असा आहे, की राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार झाला असताना, राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही, तर जबाबदार पक्ष असलेल्याकाँग्रेस नेत्याला ते शोभते का? केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करताना त्यांची खिल्ली उडवली आणि सांगितले की, नियमित पार्ट्या, सुट्टी, सुट्टी, आनंद सहली, खासगी परदेशी सहली इत्यादी आता देशासाठी नवीन नाहीत. एक खासगी नागरिक म्हणून मुद्दा नाही, परंतु जेव्हा खासदार, राष्ट्रीय राजकीय पक्षाचा कायमस्वरूपी मालक जो इतरांना उपदेश करत असतो.
परंतु काही युजर्सने राहुल गांधींची पाठ राखण करत भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यास गैर काय असा सवाल काही युर्जसने केला आहे.तर, काही युजर्सने पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदी चित्रीकरणात व्यस्त होते असा दावा करणारे ट्वीट केले आहे. एखाद्या नेत्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचा सूरही उमटत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी होण्याची शक्यता आहे.