सर्वात मोठी बातमी : महाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार 

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 15, 2019 | 14:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यात गेल्या महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रपती शासन लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे मदत मिळत नाही. प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत.

vidhansabha election 2019 mahashivaghadi shiv sena bjp congress ncp nawab malik governer bhagatsingh koshyari news in marathi
सर्वात मोठी बातमी : महाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : राज्यात गेल्या महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रपती शासन लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे मदत मिळत नाही. प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्राही त्राही करत आहेत, या संदर्भात प्रशासकी कामे सुरू करावीत या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी दिली. 

राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाल्याने अनेक प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहेत. त्यांना आता वाया गेलेले पीक जाळून पुन्हा पेरणी करायची आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांसोबत राज्यातील विविध हॉस्पिटलमध्ये गरीब गरजु रुग्ण आहेत. त्यांना मुख्यमंत्री साहय्यता निधीतून मदत मिळते. पण राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे राज्यातील रुग्णालयातील रुग्णांना मदत मिळत नाही. अशी मदत तातडीने सुरू करावी यासाठी आम्ही उद्या ३ वाजता राज्यपालांनी आम्हांला वेळ मिळणार आहे. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकत्र मिळून राज्यपालांना भेटणार आहोत, असेही मलिक यांनी सांगितले. 

काँग्रेस सरकारमध्ये येण्यास अनुत्सुक 

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आगामी महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा  नाही. पण स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना काँग्रेसने सत्ते सामील व्हावे असे वाटते आहे. तशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. राज्यात सरकार बनवणे हा उद्देश नाही तर पुढील पाच वर्ष स्थीर सरकार देणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मनोदय आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारमध्ये सामील होऊ स्थीरता द्यावी असा आमचा आग्रह असल्याचेही मलिक यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी