सत्ता संघर्षाबाबत मोदी-शहा बैठक संपली, घेतला हा मोठा निर्णय 

राज्यात भाजप आणि शिवसेनेचा सत्ता संघर्षावर तोडगा निघत नसताना या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नवी दिल्ली येथे बैठक झाली

vidhansabha election 2019 narendra modi amit shah meeting maharashtra govt formation news in marathi google batmya
सत्ता संघर्षाबाबत मोदी-शहा बैठक संपली, घेतला हा मोठा निर्णय  

नवी दिल्ली :  राज्यात भाजप आणि शिवसेनेचा सत्ता संघर्षावर तोडगा निघत नसताना या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नवी दिल्ली येथे बैठक झाली असून या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड न करण्याचे या बैठकीत ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील असा निर्णय घेतला आहे. वेळ प्रसंगी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली. 

राज्यात निवडणुका झाल्यावर भाजप हा शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसली आहे. तसेच ५०-५० चा फॉर्म्युलावर ठाम आहे. भाजपने हा फॉर्म्युला मान्य केला नाही, तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हात मिळवणी करण्याची शक्यता चाचपडून पाहत आहे. पण युतीला जनतेने कौल दिला असून आम्हांला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करावी, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहा आणि मोदी यांची बैठक झाली. 

दुपारी झालेल्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेची मागणी असलेला मुख्यमंत्रीपद हे त्यांना मिळणार नाही. ते कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नसल्याचे ठरलं आहे. यापुढे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी हे देवेंद्र फडणवीसच असणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. 

शिवसेनेने साथ दिली नाही आणि सरकार स्थापनेचा दाव न करता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा नव्याने निवडणुका घेण्याची मानसिकता भाजपच्या वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर राज्यात भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मोदी-शहा बैठकीनंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...