पवारांनी दिला सत्ता स्थापनेचा सहावा पर्याय, पाहा कोणता आहे हा धक्कादायक पर्याय 

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 04, 2019 | 22:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचे पाच पर्याय दिले आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेले जात आहेत. पण शरद पवार त्यांचे गुरू असून त्यांना सत्ता स्थापनेचा सहावा पर्यायाची हिंट आज नवी

vidhansabha election 2019 sharad pawar give hint of 6th option of govt fromation news in marathi
पवारांनी दिला सत्ता स्थापनेचा सहावा पर्याय  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचे पाच पर्याय दिले आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेले जात आहेत. पण शरद पवार त्यांचे गुरू असून त्यांना सत्ता स्थापनेचा सहावा पर्यायाची हिंट आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. जाणून घेऊ या कोणता आहे हा सहावा पर्याय... 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. सायंकाळी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत काय झाले याची थोडक्यात माहिती दिली. तसेत आपण पुन्हा मुंबईत जाऊन आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.  पण या पत्रकार परिषदेत त्यांनी सहाव्या पर्यायाची हिंट दिली आहे. 

आतापर्यंत भाजप किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच चर्चा सुरू होती. पण, शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्र्याचे समिकरणाची जाहीरपणे नाही तर हिंट दिली आहे. भाजप विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सक्षम न ठरल्यास राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी एकूण १०३ आणि मनसेचा एक आमदार असे १०४ आमदारांचा पाठिंबा काँग्रेस आघाडीला मिळू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीच सेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देऊ शकते. अशा परिस्थिती सर्वाधिक ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी शक्यता आगामी काळात होऊ शकते. 

सध्या काँग्रेस आघाडीचे संख्या बळ 

  1. काँग्रेस - ४४ 

  2. राष्ट्रवादी - ५४ 

  3. बहुजन विकास आघाडी - ३ 

  4. समाजवादी पक्ष - २ 

  5. मनसे - १

  6. शिवसेना ५६ 

  7. अपक्ष ७ पाठिंबा (शिवसेनेला)

  8. एकूण  - १६७

आमदार ही संख्या होऊ शकते. अशा परिस्थिती मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ शकतो.  त्यामुळे पर्यायी सरकार देण्यासंबंधी पवारांची ही शक्यता भविष्यात निर्माण होईल तर आश्चर्य वाटायला नको... 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...