Ocean Churning of Satyug: प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सत्ययुगातील समुद्र मंथनाचा देखावा

Prayagraj Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे २०२५ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सत्ययुगातील समुद्र मंथनाचा देखावा उभारला जाणार आहे.

view of ocean churning of Satyug will be seen in Kumbh
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सत्ययुगातील समुद्र मंथनाचा देखावा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सत्ययुगातील समुद्र मंथनाचा देखावा
  • उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे २०२५ मध्ये कुंभमेळा होणार
  • कुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सत्ययुगातील समुद्र मंथनाचा देखावा उभारला जाणार

Prayagraj Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे २०२५ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सत्ययुगातील समुद्र मंथनाचा देखावा उभारला जाणार आहे. हा देखावा उभारण्यासाठी अरैल भागातील एका १५ एकरच्या भूखंडाची निवड झाली आहे. या भूखंडावर ३०० कोटी रुपये खर्चून देखावा उभारला जाईल. 

देखाव्यात मंदराचल पर्वत तसेच समुद्र मंथनाच्या घटनेशी संबंधित अनेक ठिकाणं बघण्याची व्यवस्था असणार आहे. ही निर्मिती अशा प्रकारे केली जाईल की देखावा बघताना आपण स्वतः त्या काळात जाऊन डोळ्यांसमोर घटना बघत असल्याचा भास होईल. संपूर्ण घटनाक्रम डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवंत केला जाईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून समुद्र मंथनाशी संबंधित घटनांचा देखावा डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारला जाणार आहे.

समुद्र मंथनाचा देखावा हे एक प्रकारचे डिजिटल संग्रहालय असेल. यात सनातन धर्माच्या गौरवशाली परंपरेशी संबंधित घटनांची माहिती मिळेल. त्याग आणि ज्ञानाची थोर परंपरा समजून घेण्याची सुवर्णसंधी हे डिजिटल संग्रहालय उपलब्ध करुन देणार आहे.

सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून समुद्र मंथनाचा डिजिटल देखावा उभारला जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून हंगामी हॉटेल, शिल्पग्राम, राहण्यासाठी तंबू, हंगामी स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था आदी सोयीसुविधांची निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक परंपरागत शिल्पकारांसाठी विशेष व्यवस्था असेल. विविध पदार्थ खाण्यासाठी राजस्थानच्या चोखी ढाणीच्या धर्तीवर विशेष व्यवस्था केली जाईल. 

प्रयागराज येथील कुंभमेळा म्हणजे मानवतेचा अमूर्त आणि अलौकिक असा सांस्कृतिक वारसा असल्याचे मत युनेस्कोने व्यक्त केले आहे. हा वारसा जपणे तसेच कुंभमेळ्याला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात पुढील अनेक वर्षे हा वारसा जीवंत राहावा यासाठी प्रयत्न करणे या उद्देशानेच उत्तर प्रदेश सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहे. यापैकीच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे समुद्र मंथनाचा डिजिटल देखावा आहे. कुंभमेळ्याला येणाऱ्यांसाठी हा देखावा एक विशेष आकर्षण असेल, असे प्रयागराजचे मंडलायुक्त संजय गोयल म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी