Shahdol Gang Rape Case: बलात्काराचा आरोप असलेले पदाधिकारी विजय त्रिपाठी यांची भाजपाकडून हकालपट्टी

मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये कथित बलात्कारप्रकरणी केस दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जैतपूरचे मंडळ अध्यक्ष विजय त्रिपाठी यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे.

Rape victim
बलात्काराचा आरोप असलेले पदाधिकारी विजय त्रिपाठी यांची भाजपाकडून हकालपट्टी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना पक्षात जागा नाही
  • युवतीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
  • गंभीर अवस्थेत युवतीला तिच्या घरासमोर टाकून फरार

भोपाळ: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) शहडोलमध्ये (Shahdol) कथित बलात्कारप्रकरणी केस दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (Bhartiya Janata Party) जैतपूरचे (Jaitpur) मंडळ अध्यक्ष विजय त्रिपाठी (Vijay Tripathi) यांचे प्राथमिक सदस्यत्व (primary membership) रद्द केले आहे. त्रिपाठी यांनी जिल्ह्यातील एका फार्महाऊसवर (farmhouse) एका 20 वर्षीय युवतीचा इतर चार लोकांसह सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याचा आरोप आहे.

अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना पक्षात जागा नाही

शहडोल जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष कमल सिंह यांनी म्हटले आहे की सामूहिक बलात्कारप्रकरणी त्रिपाठी यांचे नाव आल्यावर त्यांना तात्काळ पदावरून काढून टाकण्यात आले आहे आणि त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले आहे की अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पक्षात कोणतेही स्थान नाही. भाजपा अशा कृतींची निंदा करते आणि पक्षाने अनुशासनात्मक कारवाई करत त्यांचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेतले आहे.

युवतीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुकेश वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार चार लोकांनी सदर युवतीचे अपहरण केले आणि तिला जैतापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गाडाघाट भागातील एका फार्महाऊसवर नेले. तिथे त्यांनी जबरदस्तीने तिला दारू पाजली आणि 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

गंभीर अवस्थेत युवतीला तिच्या घरासमोर टाकून फरार

वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी तिला गंभीर जखमी अवस्थेत तिच्या घरासमोर टाकले आणि ते फरार झाले. रविवारी पीडितेने चार लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की युवतीची तब्येत ठीक नसल्याने आधी तिला जैतपूर आरोग्य केंद्रात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी तिला शहडोल जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

चारही संशयित फरार, पोलिसांचा शोध चालू

वैश्य यांनी सांगितले की या प्रकरणातील चारही संशयित आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात रविवारी प्रकरण दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघेही सध्या फरार आहेत आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी