VIDEO: गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर रामदेव बाबा म्हणाले...

Ramdev Baba on Vikas Dubey encounter: गँगस्टर विकास दुबे हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. विकास दुबेच्या एन्काऊंटरवरुन विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. योग गुरू बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिलीय.

vikas dubey encounter yoga guru baba ramdev reacts
विकास दुबे एन्काऊंटरवर रामदेव बाबा म्हणाले...  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर 
  • विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर बाबा रामदेव यांनी व्हिडिओ शेअर करत दिली प्रतिक्रिया 

Ramdev Baba: उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) हिस्ट्रीशीटर विकास दुबे हा पोलीस चकमकीत ठार झाला आहे. या घटनेच्या संबंधीत सूत्रांच्या मते, पोलिसांची टीम विकास दुबे (Vikas Dubey) याला घेऊन उत्तरप्रदेशात येत होते. यावेळी पोलिसांच्या गाडीला अपघात (Police van accident) झाला आणि गाडी उलटली. गाडी उलटल्यानंतर विकास दुबे याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने हवेत गोळीबार (Firing) केला. यावेळी पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता त्याने गोळीबार केला. मग पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात दुबे मारला गेला. या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. योग गुरू बाबा रामदेव (Yog Guru Ramdev Baba) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

योग गुरू बाबा रामदेव यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत आपली प्रतिक्रिया देत त्यांनी म्हटलं, "विकास दुबे सारख्या लोकांचा असाच अंत झाला पाहिजे. संविधान, कायदा, न्यायालय आणि लोकशाही हे सर्व दुष्टांना शिक्षा देण्यासाठी आहे. पद्धत कोणतीही असो. विकास दुबे सारख्या राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला अशाच प्रकारे साफ केलं पाहिजे".

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांनी अधिकृतपणे सांगितले आहे की, उज्जैनहून उत्तरप्रदेशला विकास दुबे याला आणत होतो. त्यावेळी कानपूर जवळ पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातानंतर गाडी उलटली. मग, पोलिसांच्या हातची पिस्तूल विकास दुबेने हिसकावली आणि पळून गेला. यानंतर विकास दुबे यांनी पोलिसांत चकमक सुरू झाली. या चकमकीत विकास दुबे मारला गेला. 

राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील संबंध संपुष्टात आणण्याची मागणीही बाबा रामदेव यांनी केली आहे. राजकारण आणि गुन्हेगारीमुळे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठा अविश्वास निर्माण होतो. जे उघडपणे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांना उघडपणेच शिक्षाही करायला हवी असंही बाबा रामदेव म्हणाले आहेत.

एन्काऊंटरचे शिवसेनेकडून समर्थन 

गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या प्रकरणी शिवसेनेने एन्काऊंटरचं समर्थन केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, विकास दुबेच्या एन्काऊंटरवर कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाही पाहिजेत. मात्र, ज्या प्रकारे एन्काऊंटर झाली त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. उत्तरप्रदेशातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी झालेल्या चकमकीवर प्रश्न उपस्थित केला नाही पाहिजे असंही राऊत म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी