Boyfriend Beaten: गर्लफ्रेंडला भेटायला आलेला बॉयफ्रेंड सापडला गावकऱ्यांच्या तावडीत, कपडे काढून अशी केली धुलाई

आपल्या गावातील तरुणीला भेटायला दुसऱ्या गावातील तरुण आल्याचं समजताच गावकऱ्यांचं पित्त खवळलं आणि कुठलाही विचार न करता त्याला तुंबळ मारहाण करण्यात आली.

Boyfriend Beaten
गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या तरुणाची गावकऱ्यांकडून धुलाई  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गर्लफ्रेंडला भेटायला तरुण आला तिच्या गावात
  • गावकऱ्यांनी विवस्त्र करून केली मारहाण
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांकडून तपास सुरू

Boyfriend beaten: प्रेम (Love) आणि तारुण्य (Youth) यांचा जवळचा संंबंध आहे. तारुण्यात तरुण आणि तरुणींना एकमेकांविषयी आकर्षण वाटायला सुरुवात होते आणि अनेक जोडपी एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. आपल्या भावना त्या एकमेकांपाशी व्यक्त करतात आणि त्यातील अनेकांचे एकमेकांवर प्रेमही जडते. या प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेमसंबंधांना सुरुवात होते. काही काळाने ही जोडपी एकमेकांशी लग्न करतात, तर काही प्रेमकथा हा अल्पजिवी ठरतात. मात्र अशा प्रकारे तरुणांनी तरुणींना भेटणं आजही अनेकांना मान्य नसतं. रुढीवाद्यांकडून अशा प्रकारांना विरोध केला जातो आणि दोघांनी एकमेकांना भेटणंही त्यांना सहन होत नाही. अशा नागरिकांचा फटका अनेकदा तरुणांना सहन करावा लागतो. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नुकताच असा प्रकार समोर आला असून आपल्या प्रेयसीला (Girlfriend) भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला (boyfriend) गावकऱ्यांनी बेदम (Beaten by villagers) चोप देत त्याचे केस कापल्याचा आणि निर्वस्त्र केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

दोघांचं एकमेकांवर प्रेम

मिळालेल्या माहितीनुसार जैसलमेरजवळच्या हमीरनाडा गावात राहणाऱ्या एका तरुणीचं शेजारच्या गावात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम जडलं होतं. काही दिवसांपूर्वीच दोघांची भेट झाली होती आणि त्याची मैत्री झाली होती. हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलं होतं. अर्थात, राजस्थानच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या या दोघांनाही सामाजिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे वारंवार आणि जाहीरपणे भेटायचं दोघंही टाळत होते. काही ना काही निमित्तानं तरुण तरुणीच्या गावी यायचा आणि तिची काही मिनिटांसाठी भेट घेऊन परत आपल्या गावी निघून जायचा. लवकरच ही बाब आपापल्या घरी सांगायची आणि एकमेकांशी लग्न करायचं, असा बेत त्यांनी ठरवला होता. आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याशी लग्न करायला होकार दिल्याचा आनंद दोघांनाही झाला होता. 

अधिक वाचा - भारतीय डॉक्टर ज्याचे नाव घेताच आजही नतमस्तक होतो चीन

अशी घडली घटना

नेहमीप्रमाणे हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हमीरनाडा गावात आला होता. मात्र तेवढ्यात कुणीतरी त्या दोघांना चोरून भेटताना पाहिलं आणि गावकऱ्यांना त्याची कल्पना दिली. बघता बघता काही मिनिटांतच ही गोष्ट वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि गावात आलेल्या या तरुणाला चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. त्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि लाठ्याकाठ्या घेऊन तरुणाच्या दिशेने धावून गेले. आपल्या प्रेयसीसोबत गुजगोष्टी कऱणाऱ्या तरुणाला याची जराही कुणकूण लागली नाही. तिच्याशी गप्पा मारत बसलेला तरुण अलगद गावकऱ्यांच्या जाळ्यात फसला. 

अधिक वाचा - Breaking News 04 September 2022 Latest Update: महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी विरोधात आज काँग्रेसचा हल्लाबोल

तरुणाला बेदम मारहाण

गावकऱ्यांनी तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. अगोदर त्याचे कपडे काढून त्याला अर्धनग्न करण्यात आलं. त्यानंतर त्याचे केस कापण्यात आले. मग लाठ्याकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी त्याला तुंबळ मारहाण करण्यात आली. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा आपल्या गावात न फिरकण्याची तंबी देऊन तरुणाला सोडून दिले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी चौकशी सुरू केली असून मारहाण करणाऱ्या गावकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी