bihar crime : चेटकीण समजून गावकऱ्यांनी दलित समाजाच्या महिलेला जाळलं जिवंत, 9 जणांना अटक

झारखंड राज्याच्या सीमेजवळ हे गाव वसलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना या घटनेची माहिती आधीच मिळाली होती, परंतु गावातील नागरिकांचा दबाव पाहता पोलिसांना मागच्या पावली परत जावे लागले. महिला चेटकीण असल्याचं जेव्हा म्हटलं जात होतं. तेव्हा पोलीस तेथे पोहोचले होते.

 Mistaking her for a witch, the villagers burnt the woman alive
चेटकीण समजून गावकऱ्यांनी महिलेला जाळलं जिवंत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या प्रकरणात नऊ महिलांना अटक
  • जादूटोणा करण्याच्या संशयावरुन महिलेला जिवंत जाळलं.
  • मृत महिला ही अनुसूचित जातीची होती.

गया :  बिहार राज्याच्या गयामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. चेटकीण (witch)असल्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी एका दलित समाजाच्या (Scheduled castes)महिलेला (woman) जिवंत जाळलं (burned). ही घटना मैगरा पोलीस स्टेशन (Maigra Police Station) अंतर्गत येणाऱ्या पंचवा गावात घडली आहे. झारखंड राज्याच्या सीमेजवळ हे गाव वसलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना या घटनेची माहिती आधीच मिळाली होती, परंतु गावातील नागरिकांचा दबाव पाहता पोलिसांना मागच्या पावली परत जावे लागले. महिला चेटकीण असल्याचं जेव्हा म्हटलं जात होतं. तेव्हा पोलीस तेथे पोहोचले होते. परंतु गावकऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकत त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर मृत महिला चेटकीण असल्याचं सांगत त्या महिलेला घरात बंद करून जिवंत जाळण्यात आलं.  (Villagers burn SC woman alive thinking she is a witch, 9 people arrested)

अधिक वाचा  : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात- उद्धव ठाकरे

या मृत महिलेचं नाव रीता देवी असं आहे. तर तिच्या पतीचं नाव अर्जुन दास आहे. ही घटना घडल्यानंतर पटना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबचे (एफएसएल) पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिसरातील नमुने गोळा केले आहेत.

आरोपींच्या (पुरुष) अटकेची मोहीम तीव्र 

महिनाभरापूर्वी गावातील परमेश्वर भुईया यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. परंतु गावकऱ्यांना संशय होता की, रीता देवीने काळी जादू करत त्यांची हत्या केली.हा संशय भुईया यांच्या कुटुंबीयांनाही होता. रीता ही दास जमातीमधील होती तर परमेश्वर हा भुईया जमातीमधील होता. मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबे आणि त्यांचे समर्थकांमध्ये वाद होऊ लागला होता. शनिवारी परमेश्वरच्या कुटुंबियांनी झारखंडच्या एका ओझाला बोलवलं होते, त्याने दावा केला की, दुपारी बोलविण्यात आलेल्या पंचायतसमोर महिलेने काळी जादू करत हत्या केल्याचं कबूल केलं होतं. परंतु गावातील संतापाचे वातावरण पाहता ओझाने तेथून पळ काढला. त्यानंतर काही काळानेतर महिला आणि तिचे नातेवाईकही तेथून पळून गेले. दरम्यान महिलेचा मृतदेह हा ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

अधिक वाचा  : IND Vs ZIM: उपांत्य फेरीसाठी आज भारत- इिम्बाब्वे आमने-सामने

9 महिलांना अटक

महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी इमामगंज एसडीपीओ मनोज राम यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पथक घटनास्थळी रवाना झाली होती, जी नंतर पोस्टमॉर्टमसाठी गया येथे पाठवण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी सांगितले की, हत्येचा आरोप असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 436 आणि जादूटोणा कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणात नऊ महिलांना अटक करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी