Violence in Nagaland: गोळीबारात सैनिकासह 13 नागरिकांचा मृत्यू , केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दिले चौकशीचे आदेश

Violence in Nagaland:  नागालँड (Nagaland) च्या मोन जिल्ह्यातील तिरू गावात शनिवारी 04 डिसेंबर रोजी सांयकाळी घडलेल्या गोळीबारीची (Firing) घटनेत एक सैनिकासह 13 सामान्य नागिरकांचा मृत्यू झाला आहे.

Violence in Nagaland
Violence in Nagaland: गोळीबारात सैनिकासह 13 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दहशतवाद्यांच्या संभाव्य हालचालींबाबत विश्वसनीय गुप्तचरांच्या आधारे, तिरू गावात एक विशेष मोहीम आखण्यात आली- आसाम रायफल्स अधिकारी
  • संतप्त झालेल्या स्थानिकांनी सुरक्षा दलाच्या दोन गाड्या जाळल्या.
  • ट्रकमध्ये बसलेल्या लोकांवर सुरक्षा दलाकडून गोळीबार.

Nagaland Firing:  कोहिमा: नागालँड (Nagaland) च्या मोन जिल्ह्यातील तिरू गावात शनिवारी 04 डिसेंबर रोजी सांयकाळी घडलेल्या गोळीबारीची (Firing) घटनेत एक सैनिकासह 13 सामान्य नागिरकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) इम्नालेंसा यांनी या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या वृ्त्तानुसार ओटिंग (Oating) गावातील नागरिकांचा एक गट एक मिनी ट्रकमध्ये बसून घरी येत होते. तेव्हा सुरक्षादलाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 

स्थानिक सूत्रांनी सांगितले की, जेव्हा लोक घरी परतले नाहीत तेव्हा लोक त्यांचा शोध घेत होते. शोधल्यानंतर ट्रकमध्ये नागरिकांचे मृतदेह मिळाले. या घटनेवर संतप्त झालेल्या स्थानिकांनी सुरक्षा दलाच्या दोन गाड्या जाळल्या. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या घटनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनीही न्याय देण्याचे आश्वासन दिले आहेत. 

गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (05 डिसेंबर) सकाळी ट्विट करताना लिहिले , ''नागालँडमधील ओटिंग येथे झालेल्या दुर्दैवी घटनेने मला खूप दुःख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेची सखोल चौकशी करेल''.

दरम्यान, या घटनेबाबत आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "दहशतवाद्यांच्या संभाव्य हालचालींबाबत विश्वसनीय गुप्तचरांच्या आधारे, तिरू गावात एक विशेष मोहीम आखण्यात आली होती. जीवितहानीमागील कारणांची न्यायालयीन चौकशी उच्च स्तरावर केली जात असून योग्य ती कारवाई केली जाईल''.
आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की या कारवाईत सुरक्षा दलांना गंभीर दुखापत झाली असून त्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल आणि नंतरच्या घडामोडीबद्दल मनापासून खेद वाटतो.  या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ म्हणाले की, हे अत्यंत निंदनीय आहे आणि या प्रकरणात न्याय केला जाईल. हे सुनिश्चित करण्यासाठी, एक उच्चस्तरीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे, जे या प्रकरणाची चौकशी करेल.” मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.''

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी