रामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये हिंसा; मिरवणुकीदरम्यान गुजरात, मध्यप्रदेश आणि बंगालमध्ये दगडफेक

रामनवमीच्या (Ram Navami ) दिवशी देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसा (Violence ) उफाळून आल्याचे वृत्त आहे. गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि बंगालमध्ये मिरवणुकीदरम्यान दगफेक झाली आहे. बंगालमधील हावडा (Howrah) येथे मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली. त्याचवेळी गुजरातमधील साबरकांठामध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर हिंमतनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

Violence in several states on Ram Navami day
रामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये हिंसा (संग्रहित छायाचित्र)  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मुस्लिमबहुल भागातील मशिदीकडून मिरवणूक जात असताना बांकुरामध्ये हिंसा.
  • रामनवमीच्या दिवशी विहिंपची मिरवणूक निघत असताना एका समुदायाच्या सदस्यांकडून यात्रेत सहभागी असलेल्या लोकांवर हल्ला.
  • गुजरातमधील हिम्मतनगर आणि खंभात येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये जातीय संघर्ष

Ram Navami Day Violence  :  नवी दिल्ली : रामनवमीच्या (Ram Navami ) दिवशी देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसा (Violence ) उफाळून आल्याचे वृत्त आहे. गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि बंगालमध्ये मिरवणुकीदरम्यान दगफेक झाली आहे. बंगालमधील हावडा (Howrah) येथे मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली. त्याचवेळी गुजरातमधील साबरकांठामध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर हिंमतनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.  परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री 11.30 वाजता गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, जलद कृती दल आणि राज्य राखीव पोलीस दल सकाळी हिम्मतनगरला पोहोचलं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

बांकुरामध्ये हिंसा

बंगालमधील बांकुरा येथे रामनवमीच्या मिरवणुकी दरम्यान बजरंग दलाच्या या मिरवणुकीत भीषण हिंसाचार झाला. मुस्लिमबहुल भागातील मशिदीकडून  मिरवणूक जात असताना ही हिंसा झाली. यादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, असं वक्तव्य भाजप नेते दिलीप घोष यांनी बांकुरा येथील या गदारोळानंतर केलं आहे.  केवळ बांकुरामध्येच नाही तर हावडा येथेही मिरवणुकीत मोठा वाद झाला होता. येथे विहिंपच्या मिरवणुकीत भीषण हिंसाचार झाला. आरोपांनुसार, चौरा बस्ती भागातून विहिंपची मिरवणूक निघत असताना एका समुदायाच्या सदस्यांनी यात्रेत सहभागी असलेल्या लोकांवर हल्ला केला. त्यानंतर घटनास्थळी प्रचंड तोडफोड झाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.  

गुजरातमध्ये जातीय तणाव

गुजरातमधील हिम्मतनगर आणि खंभात येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये जातीय संघर्ष झाला. खंभातमध्ये झालेल्या जातीय संघर्षादरम्यान दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. साबरकांठा येथील छपरिया भागातील मिरवणुकीत दोन समुदायांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर काही दुकाने पेटवून देण्यात आली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणलं. 

मध्य प्रदेशातही दोन गटात हाणामारी 

मध्य प्रदेशातील निमार भागात रामनवमीच्या मुहूर्तावर मोठा वाद झाला. खरगोन आणि बरवानीमध्ये मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर तेथे जाळपोळ झाली. खरगोनच्या तालाब चौक आणि तावडी परिसरातही अनेक ठिकाणी बदमाशांनी जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड केली, त्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस दल आणि जिल्हाधिकारी यांच्यासह एसपी पोहोचले. खरगोनमधील काही भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी