दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० जुलै २०१९:  टीम इंडियाचा पराभव ते कबीर सिंगचं कलेक्शन 

Headlines of the 10 July 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० जुलै २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि दुःखाची बातमी म्हणजे वर्ल्ड कप २०१९ मधून टीम इंडिया बाहेर झाली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.  दुसरी बातमी म्हणजे गोव्यातली आहे. कर्नाटकनंतर गोव्यात राजकीय भूकंप आला आहे. विरोधी पक्ष नेत्यासह काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आधीच कर्नाटकातल्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वादळ निर्माण झालं आहे. त्यानंतरची तिसरी बातमी भारतीय रेल्वेसंदर्भातली.  रेल्वेच्या तिकिटावर आता सबसिडी नाकारता येणार आहे.  रेल्वे त्यावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. चौथी आजची महत्त्वाची बातमी एसबीआयच्या ग्राहकांसाठी आहे. एसबीआय बँकेने कर्जदारांसाठी फायद्याचा निर्णय घेतला आहे. पाचवी आजची दिवसभरातील माहिती मनोरंजन विश्वातली आहे. शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंगनं ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिससह भारताच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमानं आता बरेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. ही बातमी देताना दु:ख होतंय... पण खरंच भारत पराभूत झालायः  World Cup 2019, IND vs NZ विश्वचषक २०१९ मधील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचं विश्वचषक पटकावण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. बातमी वाचा सविस्तर.
  2. गोव्यात राजकीय भूकंप, विरोध पक्ष नेत्यासह काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्येः कर्नाटकमध्ये वेगवान राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे गोव्यातही राजकीय भूकंप झाला आहे. कारण काँग्रेसचे तब्बल १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  3.  रेल्वेच्या तिकिटावर सबसिडी नाकारता येणार; लोकलच्या मासिक पासवरही? : Indian Railway रेल्वेही आता प्रवाशांना सबसिडी नाकारण्याची सोय करून देणार आहे. रेल्वे त्यावर काम करत असून, येत्या काही दिवसांत सबसिडी नाकारण्याची सोय उपलब्ध होणार आहे. आर्थिक पाहणी अहवालात याचा उल्लेख आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. एसबीआय बँकेने घेतला कर्जदारांसाठी फायद्याचा निर्णयः SBI Loan देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मुल्य आधारीत कर्जावरील व्याज दरात ०.०५ टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. बँकेने आपल्या जाहिरातीमध्येही याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर बातमी वाचा येथे. 
  5.  २५० कोटींच्या क्लबमध्ये कबीर सिंग, ऑस्ट्रेलियामध्येही धुमाकूळः  Kabir Singh Box office collection शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग २१ जूनला रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमानं आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. बातमी वाचा येथे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० जुलै २०१९:  टीम इंडियाचा पराभव ते कबीर सिंगचं कलेक्शन  Description: Headlines of the 10 July 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles