व्लादिमीर पुतीन यांचा आधीच मृत्यू झाला, त्यांच्यासारखी हुबेहुब व्यक्ती चालवते सत्ता; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

मागील अनेक दिवसांपासून रशियाचे अध्यक्ष (President of Russia) व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे. अशातच आता ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा (Britain's intelligence) एमआय 16 च्या (MI6) प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा केला आहे.

Vladimir Putin has already died
व्लादिमीर पुतीन यांचा आधीच मृत्यू झाला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्येतही बिघडल्याचं म्हटलं जात आहे.
  • रशियाच्या विजय दिनाच्या दिवशी मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे त्यांचा बहुरुप्या असू शकतो.- गुप्तचर यंत्रणा

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून रशियाचे अध्यक्ष (President of Russia) व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे. अशातच आता ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा (Britain's intelligence) एमआय 16 च्या (MI6) प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा केला आहे. इतकंच काय तर व्लादिमिर पुतीन यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती त्या ठिकाणी काम करते, असंही दाव्यात म्हटले आहे. 
ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळानं द डेली स्टारच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. त्याच काळात गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्येतही बिघडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला. तर  अनेक जाणकार 69 वर्षीय पुतीन यांना रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) झाल्याचाही दावा करत आहेत.

युक्रेनशी तणावानंतर दिलेला पुतीन यांचा व्हिडीओ जुना?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटी पुतीन माध्यमांसमोर दिसले तो व्हिडीओ आधीच रेकॉर्ड केलेला जुना व्हिडीओ असू शकतो. रशियाच्या विजय दिनाच्या दिवशी मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे त्यांचा बहुरुप्या असू शकतो. गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतीन खूप आजारी आहेत आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही बातमी अनेक दिवस लपवून ठेवली जाऊ शकते. दुसरीकडे याचवेळी पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो आणि ती माहिती लपवली जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी