२०३६ पर्यंत 'हेच' राहणार 'या' देशाचे राष्ट्राध्यक्ष!

Vladimir Putin: रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आता 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार आहेत. जनमत चाचणीत ७७ टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले आहे.

Voting
जनमत चाचणी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पुतिन यांना २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यासाठी घेण्यात आलं जनमत
  • मतदानामध्ये सामील झालेल्या ७७ टक्के लोकांना वाटतं पुतीन हेच राष्ट्राध्यक्ष राहिले पाहिजे
  • जनतेच्या संमतीनंतर घटना दुरुस्तीचा मार्ग झाला मोकळा 

मॉस्को: रशियाच्या (Russia) राष्ट्राध्यक्षपदावर व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना २०३६ पर्यंत कायम राहण्यासाठी मतदारांनी घटनेतील दुरुस्तींना मान्यता दिली आहे. यासाठी आठवड्याभर सुरु असलेल्या जनमत चाचणीचं काम बुधवारी पूर्ण झालं. यामुळे पुतीन यांचा आणखी १६ वर्ष राष्ट्राध्यक्ष पदावर कायम राहण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. (President until 2036)  तथापि, अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार जनमत चाचणीदरम्यान लोकांवर दबाव आणणे आणि इतर अनियमितता असल्याचा आरोप केला गेला आहे. जनमत चाचणीत भाग घेतलेल्या सुमारे ७७ टक्के लोकांनी घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान केले आहे.

एक आठवडा चालली मतदानाची प्रक्रिया

घटना दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून त्यांची सध्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांना प्रत्येकी सहा-सहा वर्षाच्या दोन अतिरिक्त कार्यकाळासाठी अध्यक्षपद मिळणं निश्चित आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने रशियामध्ये मतदानाची प्रक्रिया प्रथमच आठवडाभर चालली. घटनेतील दुरुस्तीसाठी जनतेला विश्वासात घेण्यासाठी पुतीन यांनी एक प्रचंड मोहीम राबविली होती.

(फोटो सौजन्य: आयएएनएस)

पुतीन यांच्यावर आरोपही करण्यात आले

पुतीन हेच सत्तेवर कायम राहावे या उद्देशाने ही जनमत चाचणी घेण्यात येत असली, तरी जनतेला मतदानासाठी करण्यासाठी ज्या पारंपारिक पद्धती वापरल्या गेल्या त्यामुळे त्यांची प्रतिमाही डागाळली जाऊ शकते. राजकीय विश्लेषक आणि क्रेमलिनचे माजी राजकीय सल्लागार ग्लेब पाव्लोव्स्की म्हणाले की, पुतीन यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोक्याकडे दुर्लक्ष करत मतदान घेणं ही त्यांची संभाव्य दुर्बलता दिसून येते.

'पुतिन यांचा जवळच्यांचा विश्वास नाही'

पाव्लोव्स्की म्हणाले, 'पुतीन यांना आपल्या जवळच्यांचा विश्वास मिळवता आलेला नाही आणि भविष्यात काय होईल याची त्यांना चिंता लागून राहिली आहे.' ते म्हणाले, 'त्यांना या गोष्टीचा ठाम पुरावा हवा आहे की, जनता त्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहे.' मतदान प्रक्रियेच्या समाप्तीनंतर ते रहस्यमय आणि आश्चर्यकारक वातावरणही संपुष्टात येईल ज्याची सुरुवात पुतीन यांनी जानेवारीत दिलेल्या भाषणातून केली होती. ज्यात त्यांनी संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव पहिल्यांदा दिला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी