Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान, द्रौपदी मुर्मू यांचा मोठा विजय अपेक्षित

देशाच्या १५व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची (Presidential election) तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी सोमवारी संसद (Parliament) भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये (Assembly) मतदान (voting) होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशभरातील सुमारे 4,800 आमदार (MLA) आणि खासदार (MP) मतदान करणार आहेत.

Presidential Election 2022
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्या मतांचा मोठा फरक
  • संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान
  • नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी जवळपास 4,800 खासदार आणि आमदार मतदान करतील.

नवी दिल्ली :  देशाच्या १५व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची (Presidential election) तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी सोमवारी संसद (Parliament) भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये (Assembly) मतदान (voting) होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशभरातील सुमारे 4,800 आमदार (MLA) आणि खासदार (MP) मतदान करणार आहेत. मतांच्या मोजणीत पक्ष आणि विरोधक यांच्यातील प्रचंड तफावत पाहता एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदी निवड होणं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱ्या त्या आदिवासी समाजातील पहिल्या व्यक्ती असतील.

सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान

राष्ट्रपती निवडणुकीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संसद भवन परिसर आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान होणार आहे. संसद भवन संकुलात पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे सर्व ज्येष्ठ मंत्री आणि खासदारच नव्हे, तर विरोधी पक्षांचे नेते-खासदारही मतदान करतील. 

मुर्मू यांना अनेक पक्षांचे समर्थन

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार मुर्मू यांना केवळ बीजेडी, वायएसआर काँग्रेस, अकाली दलच नाही तर सत्ताधारी आघाडी व्यतिरिक्त जेडीएस, जेएमएम, शिवसेना आणि टीडीपी या विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. यावरून द्रौपदी मुर्मूला सुमारे दोनतृतीयांश मते मिळण्याची शक्यता आहे. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी परिस्थिती आव्हानात्मक दिसत आहे.  विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी प्रचार पूर्ण जोमाने सुरू ठेवला, पण निवडणुका जवळ आल्याने त्यांना विरोधी गटातील मतांचे विभाजन रोखता आले नाही.

Read Also : आजपासून खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू

21 तारखेला मतमोजणी आणि 25 तारखेला शपथविधी

सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सर्व राज्यांतील मतपेट्या दिल्लीत आणल्या जातील आणि २१ जुलै रोजी मतमोजणी झाल्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड जाहीर केली जाईल. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैच्या मध्यरात्री संपत असून 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.

Read Also : पंतच्या शतकाने भारताचा विजय झाला सोपा

खासदारांच्या मताचे मूल्य घसरले

राष्ट्रपती निवडणुकीत खासदाराच्या मताचे मूल्य 700 आहे, जे मागील निवडणुकीतील 708 होते. तर आमदारांच्या मतांचे मूल्य लोकसंख्येनुसार वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी