सँडविच देण्यास उशीर झाल्याने संतप्त ग्राहकाने वेटरवर झाडली गोळी

Waiter killed by Customer: आपण दिलेली ऑर्डर मिळण्यास उशीर झाल्याने एक ग्राहक चांगलाच संतापला. रागाच्याभरात या ग्राहकाने हॉटेलमधील वेटरवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Gun
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • सँडविच देण्यास वेटरने उशीर केल्याने ग्राहक संतापला
  • रागाच्या भरात ग्राहकाने वेटरवर झाडल्या गोळी
  • गोळीबारात वेटरचा झाला मृत्यू
  • घडलेला प्रकार पाहून हॉटेलमधील कर्मचारी, ग्राहकांना बसला धक्का

बोबिग्नी: एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेले असता तेथे ग्राहक आणि वेटरमध्ये वाद झाल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, फ्रान्समध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हॉटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकाने रागाच्या भरात चक्क वेटरवर गोळी झाडल्याचा प्रकार फ्रान्समध्ये घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. फ्रान्समधील एका कॅफत हा प्रकार घडला असून या घटनेने सर्वांनाच एक मोठा धक्का बसला आहे.

पॅरिस जवळ असलेल्या एका कॅफेमध्ये नेहमी प्रमाणे ग्राहकांची ये-जा सुरू होती. यावेळी तेथे आलेल्या एका ग्राहकाने सँडविचची ऑर्डर दिली. ग्राहकाने दिलेली सँडविचची ऑर्डर मिळण्यास उशीर झाल्याने तो ग्राहक चांगलाच संतापला आणि रागाच्या भरात या ग्राहकाने वेटरवर गोळीबार केला. पॅरिसमधील पूर्व उपनगर असलेल्या शोर-ली-ग्रँड परिसरात ही घटना घडली आहे.

आरोपी घटनास्थळावरुन फरार

संतप्त ग्राहकाने आपल्याकडी बंदूक काढली आणि वेटरवर गोळी झाडली. ग्राहकाने झाडलेली गोळी वेटरच्या खांद्याला लागली. या घटनेनंतर वेटरवर उपचारासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात आले. मात्र, वेटरचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. तर आरोपी ग्राहकाने वेटरवर गोळी झाडल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. हॉटेलमध्ये गोळीचा आवाज ऐकू येताच इतर कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.

केवळ ऑर्डर मिळण्यास उशीर झाला म्हणून ग्राहकाने वेटरवर गोळी झाडल्याने या परिसरातील स्थानिक नागरिक, हॉटेल कर्मचाऱ्यांना एक मोठा झटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सार्वजनिक स्थळांवर ड्रग्ज घेणं, दारू पिण्या सारख्या घटना घडत आहेत. 

हॉटेलमधील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, 'बंदूकधारी व्यक्ती खूपच रागात होता. त्या व्यक्तीने ऑर्डर केलेलं सँडविच तात्काळ न आल्यामुळे तो संतापला होता आणि रागाच्या भरात त्याने गोळी झाडली.' घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

फुकटमध्ये मका न दिल्याने डोळा फोडला

सँडविच देण्यास उशीर झाल्याने वेटरवर हल्ला केल्याच्या घटनेप्रमाणेच एक घटना भारतात घडली आहे. उत्तरप्रदेशातील मऊ जिल्ह्यात एका तरुणाने फुकटात मका मागितला मात्र, विक्रेत्याने फुकटात मका देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या या तरुणाने थेट त्या विक्रेत्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणी दरम्यान विक्रेत्याचा डोळाच फुटला. सध्या या विक्रेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी एक विशेष पथकंही बनवलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सँडविच देण्यास उशीर झाल्याने संतप्त ग्राहकाने वेटरवर झाडली गोळी Description: Waiter killed by Customer: आपण दिलेली ऑर्डर मिळण्यास उशीर झाल्याने एक ग्राहक चांगलाच संतापला. रागाच्याभरात या ग्राहकाने हॉटेलमधील वेटरवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी