कोरोनाची लस घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू, श्वास घेण्यास झाला त्रास

प्रमुख चिकित्सा अधिकारी डॉक्टर एमसी गर्ग यांनी टीओआयला सांगितले, ‘शनिवारी 12 वाजता मृत वॉर्डबॉय महिपाल सिंगला कोव्हिशील्ड ही लस देण्यात आली होती.’

Corona vaccine
कोरोनाची लस घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू, श्वास घेण्यास झाला त्रास  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होता 46 वर्षीय महिपाल सिंह
  • शनिवारी टोचली कोव्हिशील्डची लस, लसीकरणानंतर त्रास वाढला
  • सीएमओंनी सांगितले की मृत्यूच्या खऱ्या कारणाचा शोध चालू

बरेली: मुरादाबाद (Moradabad) जिल्ह्यात कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यानंतर एका दिवसाने एका वॉर्डबॉयचा मृत्यू (ward boy dead) झाल्याची माहिती समोर येत आहे. लसीकरणाच्या (vaccine drive) पहिल्या दिवशी 16 जानेवारी रोजी 46 वर्षीय वॉर्डबॉय महिपाल सिंह (Mahipal Singh) याने कोव्हिशील्डची (Covi-shield) लस घेतली होती ज्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास (difficulty in breathing) आणि छातीत वेदना (chest pain) होऊ लागल्या. आरोग्य कर्मचाऱ्याच्या या संशयास्पद मृत्यूने खळबळ माजली आहे. त्याच्या कुटुंबाचे (family) असे म्हणणे आहे की त्याचा मृत्यू लसीच्या साईड इफेक्ट्समुळे (vaccine side effects) झाला आहे.

श्वास घ्यायला त्रास आणि छातीत वेदना

प्रमुख चिकित्सा अधिकारी डॉक्टर एमसी गर्ग यांनी टीओआयला सांगितले, ‘शनिवारी 12 वाजता मृत वॉर्डबॉय महिपाल सिंगला कोव्हिशील्ड ही लस देण्यात आली होती. रविवारी दुपारनंतर त्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याची आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. शनिवारी लस घेतल्यानंतर त्याने रात्रपाळीत काम केले होते. त्याचा मृत्यू लसीच्या साईड इफेक्टमुळे झाला आहे असे आम्हाला वाटत नाही. तरीही त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आम्ही तपास करत आहोत. महिपाल सिंहचा मृतदेह लवकरच शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल.’

मुरादाबादमध्ये 479 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी मुरादाबादमध्ये साधारण 479 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मृत महिपालच्या कुटुंबियांचे असेही म्हणणे आहे की त्याला कधीच कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत त्याला लस देण्यात आलली. बातम्यांनुसार त्याचा मुलगा विशाल याने म्हटले, ‘लस घेतल्यानंतर माझ्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. माझे वडील बाईक चालवण्याच्या परिस्थितीतही नव्हते, म्हणून त्यांनी मला रिक्षातून त्यांना घरी नेण्यास सांगितले होते.’

लसीच्या साईड इफेक्टमुळे झाला मृत्यू – परिवार

विशाल पुढे म्हणाला, ‘मी साधारण दीड वाजता रुग्णालयात पोहोचलो. माझ्या पोहोचण्याआधीच त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांची वागणूक विचित्र होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी, साधारण 15 दिवसांपूर्वी त्यांना सौम्य ताप आला होता. मी त्यांना घेऊन घरी आलो आणि त्यांना चहा देऊन आराम करण्यास सांगितले. रविवारी जेव्हा मी कामावरून घरी आलो तेव्हा मला कळले की त्यांची तब्येत जास्त बिघडली आहे आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मला वाटते आहे की माझ्या वडिलांचा मृत्यू लसीच्या साईड इफेक्टमुळे झाला आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी