अयोध्या: राज जन्मभूमी पूजनाला राम लल्ला मंदिरात सुरूवात होण्यापूर्वी राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी रामार्चना पूजा सुरू केली आहे. या राम जन्मभूमी पूजनाच्या पूजेसाठी सर्व देवी-देवताना आवाहन करणारी ही पूजा सुरू केली आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पूजा चार टप्प्यात आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात श्री रामाव्यतिरिक्त इतर देवांची पूजा करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पवित्र अयोध्या नगरी आणि रामाच्या सैन्यातील सेनापती नल, नील आणि सुग्रीव यांची पूजा करणार असल्याची सत्यनारायण दास या पुजाऱ्यांनी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यात रामार्चना पूजा, राज दशरथ आणि त्यांच्या पत्नी कौशल्या, कैकयी आणि सुमित्रा यांचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर लक्ष्मण, भरत आणि शत्रूघ्न यांची आणि त्यांच्या पत्नी उर्मिला, मंदावी आणि श्रृतकिर्ती यांची पूजा करण्यात येईल. या पूजेत भगवान हनुमानाचीही पूजा करण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात श्री रामाची पूजा करण्यात येणार आहे.
मुख्य भूमीपूजन कार्यक्रम आज सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत होत आहे. याचे लाइव्ह डीडी नॅशनल चॅनलवर टेलिकास्ट होणार आहे.
Extensive coverage planned by @DDNational and @DDNewslive in the run up to the events in Ayodhya on wednesday, the 5th Aug. — Prasar Bharati (@prasarbharati) August 2, 2020
There will be a special live show from Ayodhya on the evening of 4th August featuring the Deepotsav from 7pm to 8pm followed by a special bilingual telecast of Newsnight from the banks of the Sarayu river @DDNational @DDNewslive — Prasar Bharati (@prasarbharati) August 2, 2020