चंडीगढ : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या कथित मारेकऱ्यांचे पहिले फोटो समोर आले आहे. टाइम्स नाऊकडे असलेल्या छायाचित्रांबद्दल असे बोलले जात आहे की हे सिद्धू मुसेवालाचे मारेकरी असू शकतात. हे फोटो फतेहाबादचे आहेत. या फोटोंमध्ये 2 लोक दिसू शकतात. ही छायाचित्रे मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीची आहेत.
या फोटोंशिवाय मूसेवालावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, जो हल्ल्यानंतरचा आहे, जेव्हा हल्लेखोरांनी बप्पी आना गावाजवळ एका अल्टो कार स्वाराला थांबवले आणि अल्टो कार हिसकावून पळ काढला. कोरोला कार अल्टो कार आणि बोलेरो कार सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
#MooseWalaBetrayed — TIMES NOW (@TimesNow) June 3, 2022
First time on TV: Men who riddled rap star with bullets; MooseWala 'killers' on camera
These visuals are from Fatehabad, says @Gurpreet_Chhina as he joins in with more details.@PriyaBahal22 with more inputs. #ExplosiveExclusive | @RShivshankar pic.twitter.com/ia3WbMNaPH