काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही टोकाला जायला तयार आहोत: पाकिस्तान

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून वारंवार अशा पद्धतीच्या धमक्या देत आहे.

PakArmyGen
काश्मीरसाठी आम्ही कोणत्या टोकाला जायला तयार आहोत: पाकिस्तान  

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी भारताला पुन्हा दिली युद्धाची धमकी
  • काश्मिरींसाठी पाकिस्तान कोणत्याही टोकाला जाण्यास तयार, बाजवांची धमकी
  • भारताच्या अंतर्गत मुद्द्यात पाकिस्तानकडून वारंवार ढवळाढवळ

इस्लामाबाद: पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा आणि शहीद दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीरबाबत पुन्हा राग आळवला आहे. काश्मीरमध्ये लोकांवर अत्याचार होत आहेत असा खोटा आरोप बाजवा यांनी केला आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असंही म्हणाले की, काश्मीर मुद्द्यावर तोडगा हा तेथील जनतेच्या इच्छेनुसार निघाला हवा. पण जर तसं झालं नाही तर आम्ही त्यासाठी काहीही करण्यास तयार आहोत. 

भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान सतत युद्धाची धमकी देत आहे. आज (शुक्रवार) पाकिस्तान लष्कर मुख्यालय रावळपिंडीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत असताना बाजवा असं म्हणाले की, 'काश्मिरींच्या अधिकारांवर हल्ला केला जात आहे. जे आमच्या लष्करासाठी एक आव्हान आहे. कारण पाकिस्तान आणि काश्मिरी जनतेचं हृदय हे एकच आहे. आम्ही काश्मिरींसाठी प्रत्येक कुर्बानी देण्यास तयार आहोत. आम्ही शेवटच्या गोळीपर्यंत, शेवटच्या शिपायापर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढू. यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहोत.' 

दरम्यान, ही काही पहिली वेळ नाही की, पाकिस्तानने अशा प्रकराची धमकी दिली आहे. कारण त्यांच्या पंतप्रधानांपासून त्यांच्या अनेक मंत्र्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे. या लोकांनी फक्त युद्धाचीच नव्हे तर अणू युद्धाची देखील धमकी दिली आहे. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आज जम्मू-काश्मीरबाबत अनेक ट्वीट केले आहेत. 

भारताने जेव्हा कलम ३७० रद्द केलं तेव्हापासून पाकिस्तान पार भंजाळून गेला आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. युनोमध्ये देखील त्यांनी चीनच्या माध्यमातून यावर चर्चा घडवून आणली होती. पण प्रत्येक वेळेस आणि सर्वच ठिकाणी पाकिस्तानची निराशा झाली होती. 

दरम्यान, भारताने काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने भारताशी सर्व प्रकारचे व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतासाठीची रेल्वे सेवा रद्द करण्यात आली. त्याला भारताने देखील प्रत्युत्तर दिलं होतं. कारण भारताने लाहोर-अटारी दरम्यान धावणारी रेल्वे भारताकडून रद्द केली आहे. पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत ११७ पॅसेंजर घेऊन भारतात येणारी समझोता एक्स्प्रेस रेल्वे सीमेवर रोखून धरली होती. त्यानंतर पाकिस्तानी रेल्वे अधिकाऱ्यांनी भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. भारताने विशेष रेल्वे इंजिन पाठवून ती रेल्वे भारतात आणली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...