अहो...आम्ही पण संसदेत PM मोदींच्या शोधात होतो, संजय राऊतांचा भाजपला टोला

pm absence in parliament : संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एक दिवस उपस्थितीत राहिल्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

 We too .. In search of PM in Parliament, Sanjay Raut criticizes BJP
आम्ही पण.. संसदेत PM शोधात, संजय राऊतांचा भाजपला टोला ।  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजप आणि केंद्र सरकारवर टिका
  • पंतप्रधानांनी अधिवेशन काळामध्ये दोन्ही अधिवेशन मध्ये हजर राहणे गरजेचे आहे
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विधीमंडळ अधिवेशनात गैरहजेरी

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thekaray) यांच्या गैरहजेरीवर भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत( sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या (PM narendra modi) संसदेच्या अधिवेशनातील उपस्थितीवर टीका केली. 'आम्ही पण संसदेत प्रधान मंत्र्यांना शोधत होतो ते येतील परंतु ते सगळीकडे दिसत होते पण मला ते संसदेत दिसले नाहीत' (We too .. In search of PM in Parliament, Sanjay Raut criticizes BJP)

राऊत म्हणाले, संसदेची परंपरा आहे की पंतप्रधानांनी अधिवेशन काळामध्ये दोन्ही अधिवेशन मध्ये हजर राहणे गरजेचे आहे आणि ते तंदुरुस्त आहेत. परंतु ते सगळीकडे दिसत होते पण मला ते संसदेत दिसले नाहीत. पण आम्ही पण संसदेत प्रधान मंत्र्यांना शोधत होतो. 

तीन-चार दिवसात मुख्यमंत्री दिसतील

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. आम्हीही पंतप्रधानांना संसदेत शोधत होतो. ते मला उत्तर प्रदेशात दिसले. परदेशात दिसले. पुतीन यांना मिठी मारताना दिसले. पण संसदेत दिसले नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत मधल्या काळामध्ये थोडीशी बरी नव्हती त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती त्याचा इतका गाजावाजा करण्याची गरज विरोधी पक्षाला नाहीये. थोडीशी माणूसकी दाखवायला पाहिजे अजून अधिवेशन तीन दिवस आहेत त्यामुळे मुख्यमंत्री जिथे आहेत तिथुन अधिवेशनाचा कामकाज सुरळीत ठेवत आहेत पुढल्या तीन-चार दिवसात मुख्यमंत्री सभागृहात विरोधी पक्षाला दिसतील.

राम मंदिर परिसरातील घोटाळा

यावेळी राऊत यांनी राम मंदिर परिसरातील घोटाळ्यांवरूनही टीका केली. मुंबईतील लहान सहान गोष्टी भूखंड, व्यवहार याचा बाऊ करणं हा सध्या भाजपचा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम झाला आहे. भाजपच्या काही लोकांच्या सूचनेनुसार आघाडीच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत. काही प्रकरण खोटी आणि बोगस आहेत. काल राम मंदिराच्या आसपासच्या जमिनी भाजपच्या परिवाराने हडप केल्याचं उघड झालं. त्यात भाजप पदाधिकारी, महापौर, नातेवाईक, आमदार, खासदार आणि नोकरशाहींनी राम मंदिर परिसरात जमिनीची खरेदी केली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी लढले कोण, मेले कोण आणि रामाच्या नावावर पैसे जमा करतो कोण? हा प्रश्न नकली हिंदुत्ववाद्यांना विचारला पाहिजे. आम्ही तो विचारला आहे, असं ते म्हणाले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी