Free Electricity: आमचं सरकार आलं तर प्रत्येक घराला ३०० युनिट वीज मोफत देणार, 'या' नेत्याने केला दावा

We will provide 300 units of free electricity: आमचं सरकार आल्यास प्रत्येक घरगुती वीज ग्राहकाला ३०० युनिट वीज मोफत देऊ असं विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. 

Lucknow
थोडं पण कामाचं
  • आमचं सरकार आल्यास प्रत्येक घराला मिळणार ३०० युनिट वीज मोफत
  • ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतची ग्राहकांची थकबाकी पूर्ण माफ करण्याचाही आपचा दावा
  • तसेच २४ तास वीज पुरवठा देण्याचाही केला दावा

Arvind Kejriwal said we will ensure 24*7 electricity supply: गुजरात विधानसभा निवडणुकांची औपचारिक घोषणा झालेली नाहीये. मात्र, राजकीय पक्षांनी आपली जोरदार तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) हे सुद्धा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारी करुन मैदानात उतरताना दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील नागरिकांना आश्वासन दिलं आहे की, आमचं सरकार इथं स्थापन झालं तर आम्ही प्रत्येक घरगुती वीज ग्राहकाला ३०० युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध करुन देऊ. (We will provide 300 units of free electricity to all domestic consumers if our government in power at Gujarat said Arvind Kejriwal)

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाकडून हे पहिलं आश्वासन नागरिकांना देण्यात आलं आहे. सुरतच्या दौऱ्यात प्रसारमाध्यम आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, काम कसं करायचं हे आम्हाला माहिती आहे, आम्ही ते केले आहे आणि काम करणं हाच आमचा हेतू आहे.

अधिक वाचा : जयंत पाटलांच्या होर्डिंगवरून पवारांचा फोटो का झाला गायब?

अरविंद केजरीवाल म्हणाले, आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये सरकार बनवण्याची संधी मिळाली तर सर्व घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल. यासोबतच शहरे आणि गावांमध्ये २४ तास वीज पुरवठा केला जाईल. यासोबतच ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतची सर्व थकित वीज बिल प्रकरणी निकाली काढण्यात येतील.

अधिक वाचा : ...म्हणून चीनच्या रस्त्यांवर आले रणगाडे

दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. गुजरातमधील पहिलं आश्वासन म्हणून आम आदमी पक्षाने ३०० युनिट वीज मोफत देण्याबाबत केजरीवाल म्हणाले, निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्ष निवडणूक जाहीरनामा घेऊन येतात, कुणी संकल्प पत्र घेऊन येतं पण आम्ही गॅरंटी घेऊन आलो आहोत.

गुजरातमध्ये पॉवर कट नाही

अरविंद केजरीवाल म्हणाले, जर आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर पुढील निवडणुकीत आम्ही मतंही मागायला येणार नाही. ३०० युनिट मोफत वीज दिली जाईल आणि संपूर्ण गुजरातमध्ये कुठेही वीज कपात किंवा लोडशेडिंग होणार नाही. केजरीवाल पुढे म्हणाले, नागरिकाना हजारो-लाखो रुपयांची बनावट वीज बिले पाठवली जातात आणि त्यानंतर बिल कमी करण्याच्या नावावर वीज विभागाचे कर्मचारी भ्रष्टाचार करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी