Pak PM Shehbaz Sharif । नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये नव्या सरकारची स्थापना झाली आहे मात्र पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप चालू आहेत. आता पीएम शाहबाज शरीफ यांनी इम्रान खानविरूद्ध कायद्याने कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. शरीफ यांनी रविवारी म्हटले की, जर इम्रान खानने लोकांना गृहयुद्ध करण्यासाठी भडकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरूद्ध कायद्याने कडक कारवाई केली जाईल. जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांनी इम्रान खान यांच्या अबोटाबादमधील भाषणाचे वर्णन ‘पाकिस्तानविरुद्धचे षड्यंत्र’ असे केले आहे. (We will take strict action if people are threatened for civil war say Shehbaz Sharif).
अधिक वाचा : मुंबईतल्या 'या' रेल्वे स्थानकांवर दर महागला, जाणून घ्या का?
शाहबाज शरीफ यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पाकिस्तानची २२ कोटी जनता, राज्यघटना आणि राष्ट्रीय संस्था कोणत्याही एका व्यक्तीच्या अहंकाराचे गुलाम नाहीत. इम्रान काही लोकांना आपले गुलाम बनवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र आम्ही त्याला पाकिस्तानचा हिटलर होऊ देणार नाही.
त्यांनी म्हटले, "इम्रान जवळच्या लोकांशी खूप खोटं बोलला मात्र त्याला आता सत्याचा सामना करावा लागेल." राष्ट्रीय संस्थांबद्दल चुकीचे मत मांडण्याचा प्रयत्न करणारे खरे तर मीर जाफर आणि मीर सादिक असल्याचे शरीफ म्हणाले. माहितीनुसार शाह म्हणाले की, इम्रानला पाकिस्तानला लिबिया आणि इराकसारखा बनवायचा आहे. ज्यांनी त्याला खायला दिले त्यांचे हात त्याला कापायचे आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी म्हटले, इम्रान खान राजकारण करत नसून ते देशाविरुद्ध षडयंत्र रचत आहेत. माहितीनुसार, अबोटाबादच्या रॅलीत इम्रानने दावा केला की, 'तो भिकारी, नोकर आणि चोर आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, नवीन सरकार आल्यानंतर देशात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. दुकानात जाऊन तुपासारख्या खाद्यपदार्थांच्या किमती जाणून घ्या, असे आवाहन इम्रानने माध्यमांना केले.