Weather Update : राजस्थानमध्ये पारा शून्याच्या खाली, राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

Weather Update : देशात सध्या थंडीने हुडहुडी भरवली असून उत्तर (North)-पश्चिम (West) भारतातील थंडीची लाट बुधवारपर्यंत कायम राहणार आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे.

Weather Update
राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम.
  • पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता

Weather Update Cold Wave : नवी दिल्ली : देशात सध्या थंडीने हुडहुडी भरवली असून उत्तर (North)-पश्चिम (West) भारतातील थंडीची लाट बुधवारपर्यंत कायम राहणार आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे. मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) थंडीची लाट आणि कडाक्याची थंडी पाहता ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितलं की, पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट (Cold Wave) आणि तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम राहील आणि त्यानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रतही मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट (Cold Wave in Maharashtra) येण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना संपताना महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. परभणीत पारा 7.6 अंशांवर घसरला असून  यंदाच्या मोसमातील हे नीच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.  तर भंडारा जिल्ह्यातही पारा घसरला असून जिल्ह्यात 9 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिल्हात काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली. राज्यामध्ये थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. यामुळे परभणी, भंडारा, वाशिम, हिंगोलामध्ये नागरिक शेकोट्या करून गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. इतकच नाहीतर कोकणातही हुडहुडी भरणारी थंडी आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही पारा घसरला आहे. 

"पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 24 तासांत काहीच भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे,"असे IMD ने म्हटले आहे.उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये बुधवारी दुपारपर्यंत आणि जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, गंगा पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही लाट कमी होण्याची उच्च शक्यता आहे.

22 ते 25 डिसेंबर या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आहे. 24 डिसेंबरला पंजाबमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 डिसेंबर रोजी पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये आणि पश्चिम राजस्थानमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या बहुतांश भागात थंडी असून चुरू आणि सीकरसह अनेक ठिकाणी किमान तापमान शून्याच्या खाली नोंदवले जात आहे. फतेहपूरमध्ये रविवारी रात्रीचे किमान तापमान उणे 1.8 अंश सेल्सिअस होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी