Weather Update: वरुणराजाचे या दिवशी होणार आगमन; IMD अंदाज

Weather Latest News: भारतीय हवामान विभागाच्या मते, लवकरच लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल. पावसामुळे तापमानात घट होऊन उष्णता कमी होईल.

Weather Update: Relief from scorching heat, it will rain on this day; IMD Prediction
Weather Update: वरुणराजाचे या दिवशी होणार आगमन; IMD अंदाज,   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यामध्ये भीषण उष्णतेचा कहर सुरूच
  • उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळू शकतो,
  • 16 मे नंतर राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Alert On Rain: देशभरात अनेक राज्यांमध्ये भीषण उष्णतेचा कहर सुरूच आहे. विदर्भात या महिन्यात अनेक ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळू शकतो, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. 16 मे नंतर राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update: Relief from scorching heat, it will rain on this day; IMD Prediction)

अधिक वाचा : 

Marital Rape: वैवाहिक बलात्काराला गुन्हा समजावा का? दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांमध्येच नाही एकमत, SC मध्ये अपील होण्याची शक्यता

पाऊस कधी पडेल?

ते पुढे म्हणाले की दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये 13 ते 14 मे दरम्यान उष्णतेची लाट सुरू होऊ शकते. आणखी एक सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स 16 मे च्या आसपास येत आहे आणि त्यानंतर 21 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार आहे, असा अंदाजही या संस्थेने वर्तवला आहे.


येथे उष्णतेचा प्रकोप होईल

विशेष म्हणजे, रविवारपासून पुन्हा एकदा कडक उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आसनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्वेकडील वाऱ्यांनी उष्णतेपासून वाचवले आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढू शकतात.

अधिक वाचा : 

Sedition Law: काय आहे १५२ वर्षांचा जुना 'राजद्रोह कायदा'? ज्याला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती 

खाजगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, एकापाठोपाठ एक हलका पाऊस, वादळ आणि जोरदार वाऱ्यामुळे गेल्या आठवड्यात उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. मार्चमधील अंदाजानुसार, साधारण 15.9 मिमी पाऊस पडला, जो झाला नाही. एप्रिलमध्ये 12.2 मिमीच्या मासिक सरासरीच्या तुलनेत 0.3 मिमी पाऊस पडला. महिन्याच्या शेवटी, तीव्र उष्णतेने अनेक भागांमध्ये पारा ४६ अंश सेल्सिअस आणि ४७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी